यवतमाळ : ‘त्या’ पाच कुटुंबांचा आधारवडच कोसळला

नागपूर जिल्ह्यातील अम्माचा दरगाह (ता. पारशिवणी) जवळच्या कन्हान नदीत बुडालेले दिग्रसच्या बाराभाई मोहल्ल्यातील पाचही तरुण त्यांच्या कुटुंबातील कमावत्या व्यक्ती होत्या.
nagpur
nagpursakal

दिग्रस (जि. यवतमाळ) : नागपूर जिल्ह्यातील अम्माचा दरगाह (ता. पारशिवणी) जवळच्या कन्हान नदीत बुडालेले दिग्रसच्या बाराभाई मोहल्ल्यातील पाचही तरुण त्यांच्या कुटुंबातील कमावत्या व्यक्ती होत्या. त्यातील तिघेजण टाईल्स लावण्याचे काम करायचे, तर एकाचे वडील अंध आहे, तर एक त्याच्या आईवडिलांना एकूलता एक मुलगा आहे. या घटनेमुळे या पाच जणांच्या कुटुंबांचा आधारवडच कोसळला आहे.

टाइल्स बसवण्यात तरबेज असलेला मो. सिफतैन मो. इकबाल हा २१ वर्षीय युवकाचे वडील अंध आहे. त्यांन अंधत्व आल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सिफतैनवर आली होती. ही जबाबदारी तो समर्थपणे सांभाळतही होता. आता त्याच्या अंध वडिलांची काठीच हरविली असून, त्याच्या पश्‍चात आईवडील, एक भाऊ व बहीण आहे.

nagpur
'त्या' घटनेनंतर ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते...

टाईल्स बसवण्याचे काम करणारा अयाज बेग मिर्जा हाफिज बेग (वय २०) याचे वडील शहरातील जुन्या बसस्थानकावर पंक्चर बनवण्याचे व सायकल दुरुस्तीची कामे करतात. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे त्यांचा व्यवसाय मंदावला होता. त्यामुळे वडिलांना मदत करण्यासाठी तो टाईल्सचे काम करायचा. त्याच्या मागे आईवडील, एक भाऊ व बहीण आहे. अय्याजप्रमाणेच टाईल्स बसवण्याचे काम करणारा १७ वर्षांच्या मिर्जा ख्वाजा बेग तबुस्सर बेग याचे वडील हातगाडीवर केळी विकतात. तितक्या मिळकतीत घर चालत नसल्याने तो टाईल्सचे काम करून वडिलांना आर्थिक मदत करायचा. त्याला आईवडील व एक लहान भाऊ आहे.

सय्यद अरबाज सय्यद परवेज उर्फ लकी याचे वडील हयात नाही. त्याच्या पश्‍चात आई व दोन लहान भावंड आहेत. तो फ्लिपकार्टमध्ये कुरिअर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देत होता. २२ वर्षीय अरबाज घरात एकटाच कमावता होता. त्यामुळे लकीच्या जाण्याने त्याच्या आईचा आधारवड हरवला आहे. मो.अबुजर मो. अल्ताफ (वय १८) याचे वडील नगरपालिकेत लिपिक आहे व तो आईवडिलांना एकुलता व आणि कुटुंबातील सर्वांत छोटा मुलगा होता. अबूजरच्या अपघाताने कुटुंबीय नि:शब्द झाले आहेत. त्याच्या पश्‍चात आईवडील व दोन बहिणी आहेत.

nagpur
नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

हिंदू-मुस्लिम समाजात शोककळा

शहराला सामाजिक सलोख्यासाठी ओळखले जाते. हिंदू-मुस्लिम समाजातील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. सर्व सणोत्सव हिंदू-मुस्लिम समाजबांधव एकत्र येऊन साजरे करतात. पाचही युवक बुडाल्याने हिंदू-मुस्लिम समाजावर शोककळा पसरली आहे. अनेक जण संबंधित मुलांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत आहेत. पाचही जणांनी शनिवारी (ता.चार) रात्री उशिरापर्यंत येथील मशिदीजवळ शरबतचे वाटप केले होते. त्यानंतर रात्री १२.३० वाजता ते दिग्रसवरून नागपूरच्या दिशेने निघाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com