esakal | पोटनिवडणूक; १४ जागांसाठी १०२, २८ जागांसाठी १७४ अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

पोटनिवडणूक; १४ जागांसाठी १०२, २८ जागांसाठी १७४ अर्ज

पोटनिवडणूक; १४ जागांसाठी १०२, २८ जागांसाठी १७४ अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या रिक्त झालेल्या ४२ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ५ जुलै) उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गर्दी केली. शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्हा परिषदेच्या १४ जागांसाठी ९९ उमेदवारांनी १०२ तर पंचायत समितीच्या २८ जागांसाठी १६९ उमेदवारांनी १७४ अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करते वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला सोशल डिस्टसिंगसह (सुरक्षित अंतर) इतर नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. (By-elections; 102 for 14 seats, 174 for 28 seats)

जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के नुसारच निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मार्च २०२१ मध्ये अकोला जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गासाठीच्या १४ तर अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा पंचायत समितींच्या २८ जागांवर गडांतर आले होते. त्यानंतरच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेणे टाळले. दरम्यान आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने पोटनिडवणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी सर्वांनाच कोरोनाच्या नियमांचा विसर पडला होता.

हेही वाचा: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्हतालुकानिहाय एकूण दाखल अर्ज (कंसात उमेदवार)
तालुका जि.प. पं.स.
तेल्हारा १९ (१९) २२ (२१)
अकोट १६ (१५) २१ (२१)
मूर्तिजापूर ११ (१०) २१ (२०)
अकोला २९ (२९) २९ (२९)
बाळापूर १२ (१२) २८ (२८)
पातूर ०६ (०६) २४ (२३)
बार्शीटाकळी ०९ (०८) २९ (२७)
-------------------------------------------
एकूण १०२ (९९) १७४ (१६९)
-----------------------
प्राप्त अर्जांची छानणी आज
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करणाऱ्याकडून प्राप्त अर्जांची मंगळवारी (ता. ६) छानणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये नियमानुसार अर्ज न भरणाऱ्यांचे अर्ज निवडणुकीतून बाद ठरवण्यात येतील व अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रक्रियेसंदर्भात १२ जुलैपर्यंत न्यायालयात दाद मागता येईल व न्यायप्रविष्ट प्रकरण नसलेल्या ठिकाणी १२ जुलै तर न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या ठिकाणी १४ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

संपादन - विवेक मेतकर

By-elections; 102 for 14 seats, 174 for 28 seats

loading image