Akola News : दिव्यांग मतदारांसाठी कॉल सेंटर; जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी घेतला आढावा

दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी आणि दिव्यांग मतदार जनजागृतीसाठी शहरातील मलकापूर परिसरातील मूकबधीर मुलींच्या शाळेत कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.
call centers for disabled voters collector Ajit Kumhar reviewed lok sabha election 2024
call centers for disabled voters collector Ajit Kumhar reviewed lok sabha election 2024 Sakal

Akola News : दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी आणि दिव्यांग मतदार जनजागृतीसाठी शहरातील मलकापूर परिसरातील मूकबधीर मुलींच्या शाळेत कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार व ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांनी शनिवारी (ता. २०) कॉल सेंटरला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

अकोला लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेगाना तयारी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात मूकबधीर मुलींची शाळा येथे कॉल सेंटर सुरू आहे.

त्यांनी शनिवारी (ता. २०) कॉल सेंटरला भेट देऊन तेथील कामांची माहिती घेतली. दिव्यांग बांधवांपर्यंतची मतदानासाठीच्या सर्व सुविधांची माहिती पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. दिव्यांगांचे जिल्ह्यात १०० टक्के मतदान व्हावे, असे नियोजन आहे. त्यादृष्टीने सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती सीईओ वैष्णवी यांनी दिली.

असे चालते कॉल सेंटरचे कामकाज

कॉल सेंटरमधून दिव्यांग मतदारांना कॉल करून मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यांना सक्षम ॲपबद्दल माहिती दिली जात आहे. त्यांच्या अडचणी जाणून मतदान केंद्रांवर उपलब्ध सुविधा जसे की व्हील चेअर, पिकअप अँड ड्रॉप व्हॅन, तसेच मदतनीस आदी सुविधांची माहिती देण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांना मतदानाबाबत काही जाणून घ्यायचे असल्यास १९५० टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे.

पाच हजारांवर दिव्यांगाशी थेट संपर्क

समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मून, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप सुसतकर यांच्या मार्गदर्शनात केंद्रात स्व. कनूबाई वोरा अंध विद्यालय, कर्णबधीर मुलींची शाळा व स्व. मोतीरामजी चिंचोलकर विद्यालय, संत गाडगेबाबा मूकबधीर विद्यालय येथील २२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत शहरातील ५ हजार ८१२ दिव्यांग व्यक्तींशी थेट संपर्क करण्यात आला. अधीक्षिका सुष्मा मसने, गजानन महल्ले, राजेश खुमकर, सुनील बोंगीरवार, शेखर भोंबळे, संदीप गुळाखे, किशोर ठाकरे, उज्ज्वला मानकर, सचिन चव्हाण, गब्बरसिंग राठोड, संजय बरडे, मो. अजीज आदी समन्वय व परिश्रम घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com