

Indian Community Seeks Protection for 40-Year-Old Shri Ram Temple in Peterborough
sakal
अकोला: ब्रिटनमधील पीटरबरो येथे गेल्या चार दशकांपासून अस्तित्वात असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र मंदिराच्या जागेचा लिलाव करण्याच्या कथित निर्णयावरून श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत संस्थेने भारत सरकारने तातडीने राजनैतिक स्तरावर हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.