धारूर शाहनूर परिसरात आढळली गांज्याची झाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : धारूर शाहनूर परिसरात आढळली गांज्याची झाडे

अकोला : धारूर शाहनूर परिसरात आढळली गांज्याची झाडे

अकोला : मादक अमली पदार्थ गांजाची शेतात झाडे लावणाऱ्या अरोपीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत गांजाची सहा झाडे, दोन हजार ७०० ग्रॅम गांजा असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल धारूल शाहनूर गावाजवळील शेतशिवारात जप्त करण्यात आला.

अकोट शहरात पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील पेट्रोलिंग करीत असताना विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की, धारूर शाहनूर शेतशिवारात रामेश्वर तायडे (२७) याने मादक अमली गुंगीकारक पदार्थ गांजाची झाडे लागवड केली आहे. त्या झाडांचा गांजा काढून तो विक्री करीत आहे.

हेही वाचा: इचलकरंजीत १७ टक्के बनवेगिरी : वयाची चोरी करून पेन्शनची खाती

अशा खात्रिशिर माहितीवरून पंच व पोलिस कर्मचाऱ्यांसह रामेश्वर तायडे याच्या शेतशिवारात छापा मारला. त्याच्या शेतात सहा गांजाची मोठी झाडे अंदाजे पाच ते सहा फुट उंचीची विनापरवाना लागवड करून तो सांभाळत असल्याचे आढळून आले.

त्याच्या शेतातील घरात ही दोन हजार ७०० ग्रॅम गांजा विक्री करता ठेवला असल्याने आढळून आले. आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली.

loading image
go to top