esakal | आम्हालाही त्यांच्या अग्रलेखामध्ये कुठलाच इंट्रेस नाही; आघाडी सरकारवर घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut chandrakant patil

आम्हालाही त्यांच्या अग्रलेखामध्ये कुठलाच इंट्रेस नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि. बुलडाणा) : भाजप कार्यकर्त्यांची कामासाठी धडपड बघता भाजप पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे आहेत, ही बाब शिवसेनेला जिव्हारी लागल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत उठसूट प्रवचन करतात. त्यांनी भाजपकडे लक्ष देऊ नये, आम्हालाही त्यांच्या अग्रलेखामध्ये कुठलाच इंट्रेस नाही. आता ज्‍यांनी साथ सोडली त्‍यांचा किंचितही विचार न करता स्‍वबळावर सत्ता हेच ध्येय आहे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

शेगाव विश्राम भवन येथे जळगाव जामोद मतदार संघाचे पदाधिकारी कार्यकर्ता परिचय मेळावा व स्वागत समारंभ कार्यक्रमात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जळगाव जामोद मतदार संघाचे आ. डॉ संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाल्ले यांची उपस्थिती होती. आगामी नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहोत. शिवसेनेबरोबर ३० वर्षे आमची युती होती. मात्र, २०१४ मध्ये युती तुटल्यावरही आम्ही सर्वप्रथम त्‍यांचाच विचार केला. परंतु, ते २०१९ मध्ये विश्वासघात करून ५६ आमदारांच्या साहाय्याने मुख्यमंत्री बनले ते सर्वसामान्यांना न पटणारे आहे. जनता त्‍यांना त्‍यांची जागा दाखवून देईलच. त्‍यामुळे आता स्‍वबळ हेच आमचे ध्येय आहे, असेही ते म्हाणाले.

राणे हे भाजपमध्ये येण्याआधी शिवसेनेच्या तालमीत वाढले आहेत. त्‍यामुळे रोखठोक बोलणे हा त्‍यांचा स्‍वभाव आहे. राजकारणात असे वक्‍तव्‍य होतच असतात परंतु, केवळ राजकीय द्वेषापोटी कॅबिनेट दर्जाच्‍या मंत्र्यांला अटक करणे, ही बाब निषेधार्थ आहे, असे त्‍यांनी सांगितले. इंधनाचे दर कमी करण्याची किल्ली अजित पवार यांच्याकडेच आहे, ते अर्थमंत्री आहेत. जगामध्ये जे क्रूड ऑईल खरेदी विक्री केले जाते, त्‍यानुसार दर बदलत असतात. केंद्र सरकार ५० टक्‍के भार उचलते तर ५० टक्‍के राज्य सरकार, परंतु राज्‍य सरकार हे प्रत्‍येकवेळी केंद्रावर खापर फोडून मोकळे होते. वास्‍तविक पाहता क्रूडच्या प्रोसेसमध्ये राज्य सरकार ३५ टक्‍के पैशाचा मलिदा लाटत आहे. त्‍यामुळे त्‍यांनी ३५ पैशामध्ये दर कमी करावे त्यावेळी इंधनाचे गगनाला भिडलेले दर कमी होतील असेही चंद्रकांत पाटील म्‍हणाले.

loading image
go to top