रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तेल्हारा येथे गाढव आंदोलन

रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तेल्हारा येथे गाढव आंदोलन
Updated on: 

तेल्हारा ः तालुक्यात येणाऱ्या अडसूळ-तेल्हारा, तेल्हारा-वरवट, तेल्हारा-वणी वारूळा व तेल्हारा-हिवरखेड या चारही मुख्य रस्त्यांचे काम रखडलेले आहे. ते त्वरित सुरू करावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी तेल्हारा यांना निवेदन दिले होते. जर ता. २१ जूनपर्यंत काम सुरू झाले नाही तर गाढव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय तेल्हाऱ्याच्या समोर गाढव आंदोलन करण्यात आले. (Donkey movement at Telhara to start road work)

रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तेल्हारा येथे गाढव आंदोलन
नेता असावा तर असा! वेशांतर करुन गुटखा विक्रेत्यांवर बच्चू कडूंची धाड


तेल्हारा शहरात येणारे चार मुख्य रस्ते आहेत. रस्ते विकासाच्या नावाखाली या चारही रस्त्यांचे खोदकाम दोन-तीन वर्षांपूर्वी करून ठेवलेले आहे. यामध्ये तेल्हारा-अडसूळ हा अकोला जाण्यासाठी, तेल्हारा-वरवट हा जळगाव जामोदला जाण्यासाठी तर तेल्हारा-वणी वारुळा देवरी फाट्यावर जाण्यासाठी, तेल्हारा-हिवरखेड अकोटला जाण्यासाठी वापरल्या जातो. या चारही रस्त्यांचे पुनर्बांधणी करण्याच्या नावाखाली खोदकाम करून ठेवलेले आहे व खोदलेल्या रस्त्यावर पिवळी माती तर काही ठिकाणी मुरूम टाकलेला आहे.

रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तेल्हारा येथे गाढव आंदोलन
होणाऱ्या पती समोरच प्रेयसीला वाहनातून पळविले

सद्यस्थितीत पाऊस सुरू झालेला असल्याने रस्त्यांवर चिखल आहे. या चिखलातून दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवणे एक कसरतच असते. अनेक दुचाकी स्वार वाहन घसरून पडले. लहान-मोठे अनेक अपघात घडले. अनेकांचे काही अवयव निकामी झाले तर काहींची जीवही गेला. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला याची चिंता नाही. अनेक वेळा निवेदन देऊन जाग येत नाही. अधिकाऱ्यांना निवेदन दिले की लगेच काम सुरू करू अशा प्रकारचे आश्वासन देऊन बोळवण करतात. हे नेहमीचेच झाले आहे.

रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तेल्हारा येथे गाढव आंदोलन
दहावीच्या शिक्षकांची दमछाक, परीक्षेसाठी निरोप पाठवून दुर्लक्ष

त्यामुळे नागरिकांनी ता.८ एप्रिल २०२१ ला निवेदन दिले. तेव्हा अधिकाऱ्यांनी २२ एप्रिल २०२१ पासून रस्त्यांची कामे सुरू होतील अशा प्रकारचे आश्वासन दिले. पण काम सुरू झाली नाही. त्यामुळे पुन्हा एक स्मरण पत्र देऊन ता.२० जून २०२१पर्यंत काम सुरू झाले नाही तर ता. २१ जून २०२१ रोजी गाढव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग तेल्हारा यांना दिला होता. ता.२० जूनला संबंधित रस्त्यांचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे सोमवार, ता.२१ जूनला गाढव आंदोलन कार्यालयासमोर करण्यात आले.

आतातरी अधिकाऱ्यांना जाग येईल का व रस्त्याची कामे त्वरित सुरू करतील का अशा प्रकारचा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. यासाठी सामाजिक आंदोलन संघ या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला होता.

संपादन - विवेक मेतकर

Donkey movement at Telhara to start road work

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com