

Chikhaldara Tourist Spot Accident Youth Dies After Falling Into Deep Valley While Taking Selfie With Friends
esakal
बार्शीटाकळी : मित्रांसोबत चिखलदरा येथे फिरण्यासाठी गेलेल्या बार्शीटाकळीतील युवकाचा सेल्फी घेताना तोल जाऊन पंधरा ते वीस फूट खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष लाडके ४० असे मृत युवकाचे नाव आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते बारा च्या सुमारास परतवाडा–चिखलदरा मार्गावरील वनविभागाच्या एका पॉइंटजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने बार्शीटाकळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लाडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.