esakal | चीनच्या या 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी केली जाहीर...हा नवीन संघर्ष पेटणार
sakal

बोलून बातमी शोधा

bycott china product in india.jpg

चीनच्या 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी श्री रामनवमी शोभायात्रा समितीने जाहीर केली आहे.

चीनच्या या 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी केली जाहीर...हा नवीन संघर्ष पेटणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : लडाख सीमेवर भारत-चीन संघर्षामुळे श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना केले आहे.

चीनच्या 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी श्री रामनवमी शोभायात्रा समितीने जाहीर केली आहे. लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. चीनला संधी मिळाल्यावर ते भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतात, अशा शब्दात आमदार शर्मा यांनी टीका केली आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये तब्बल 45 वर्षांनी एवढा मोठा संघर्ष झालेला पाहायला मिळाला. 

महत्त्वाची बातमी - आधी ‘तो’ जवान लढला कोरोनासोबत; भारत-चिन सीमेवर तणाव निर्माण होताच निघाला कर्तव्यावर

गलवान खोऱ्यात सुरू झालेला हा सीमा वाद आता दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडवू शकतो. भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 भारतीय सैनिक शहीद झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. चीनची भूमिका देशहिताविरोधात असल्याने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय सर्व राष्ट्र भक्तांनी घ्यावा. 

‘भारतीय सामान, हमारा अभिमान’ या अभियानाअंतर्गत 500 हून अधिक  कॅटेगरीतील उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त उत्पादकांचा समावेश आहे, जे चीनमध्ये तयार होतात आणि भारतात आयात केले जातात. या 500 कॅटेगरीमध्ये समावेश असणाऱ्या तीन हजार वस्तूंमध्ये रोजच्या वापरातील वस्तू, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, टेक्सटाइल, बिल्डर हार्डवेअर, फुटवेअर, गारमेंट, स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, लगेज, हँड बॅग, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आयटम, इलेक्ट्रिकल तसंच इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अपॅरल, खाण्याच्या काही वस्तू, घड्याळं, काही प्रकारचे  दागिने, वस्त्र, स्टेशनरी, कागद, फर्नीचर, लायटिंग, हेल्थ प्रोडक्ट्स, पॅकेजिंग प्रोडक्ट, ऑटो पार्ट्स, यार्न, फेंगशुई आयटम्स, दिवाळी तसंच होळीसाठी लागणारं सामान, चश्मा, टेपेस्ट्री मटेरियल यांचा समावेश आहे. 

चीनमधून वार्षिक 5.25 लाख कोटी अर्थात 70 बिलियन डॉलरची आयात केली जाते. या वस्तू भारतात देखील बनतात; मात्र चीनच्या वस्तू अधिक स्वस्त असल्याने त्यांची आयात केली जाते. भारत या वस्तुंवर चीनवर अवलंबून राहू नये. चीनमध्ये बनणाऱ्या वस्तू भारतात आयात होऊ नये हे या अभियानेचे सारथी प्रत्येक राष्ट्र भक्तांनी व्हावे, असे आवाहन रामनवमी शोभायात्रा समितीने केले आहे.