जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद

जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद

अकोला ः कोविड १९ च्या उपचारामध्ये प्रारंभिक अवस्थेत संसर्ग लक्षात येणे व लवकरात लवकर उपचार सुरु होणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण रुग्णांना गंभीर होण्यापासून तसेच मृत्यूपासूनही वाचवू शकतो, तरी ग्रामीण भागात आपली सेवा देणाऱ्या सर्व जनरल फिजिशियन्सने कोरोना संसर्गाच्या प्रारंभिक अवस्थेतच रुग्ण शोधण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. (Collector-Akola- online-interaction-with-doctors-in-rural-areas)

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता फैलाव तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व म्युकरमायकोसिस या आजाराची वाढत असलेली रुग्णसंख्या याबाबत गुरुवारी (ता. २७) जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या खासगी जनरल फिजिशियन डॉक्टर्सशी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.

जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद
म्युकरमायकोसीस आजार कसा ओळखाल? गैरसमजच अधिक; घ्या योग्य उपचार

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक तथा उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच सर्व तालुक्यातील डॉक्टर्स ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. आज दिवसभरात मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी व अकोला या तालुक्यातील डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला. यावेळी डॉ. राजकुमार चव्हाण तसेच डॉ. सुरेश आसोले यांनी डॉक्टर्सना कोविड संदर्भात वापरावयाची उपचार पद्धती व उपचार अनुक्रमता याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद
पुष्पराज गावंडे राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी

लवकर चाचणी लवकर उपचार पद्धतीचा अवलंब करा
आपण ज्या भागात आपली सेवा देता त्या भागाला-गावाला कोरोनामुक्त करणे हे आपले कर्तव्य असून त्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना प्रारंभिक अवस्थेतच चाचणीसाठी प्रवृत्त करावे. पेशंटचा अहवाल कोविड निगेटिव्ह असल्यास त्यावर पुढील उपचार करावे अन्यथा त्यास शासकीय यंत्रणेच्या दवाखान्यात पाठवावे. आपल्याकडे येणाऱ्या कोविड संशयित रुग्णांची एक यादीही आपण स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अथवा आरोग्य यंत्रणेकडे देऊ शकता. त्याव्यक्तींचा स्थानिक पातळीवर पाठपुरावा करता येईल. या लवकर चाचणी व लवकर उपचार या पद्धतीचा अवलंब हा केवळ संसर्ग रोखण्यासाठी आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.


म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची माहिती द्या
ग्रामीस भागात आता बरेच लोक जे कोविडचे उपचार घेऊन बरे होऊन परत गेले आहेत अशा लोकांवरही आपण स्थानिक पातळीवर म्युकरमायकोसिसच्या संसर्गाबाबत लक्ष ठेवावे, त्यांना याबाबत समजावून सांगावे. त्यासोबतच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व त्यात लहान बालकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका वर्तवण्यात आल्याने बालकांच्या आरोग्याकडेही आपण लक्ष द्यावे, त्यांच्या तपासण्या व लक्षणांतील बदल प्रशासनास तात्काळ कळवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Collector Akola's online interaction with doctors in rural areas

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com