Neelam Gorhe : महिला अत्याचार रोखण्यासाठी समाजाचा सहभाग वाढवावा

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे बोलत होत्या.
Neelam Gorhe
Neelam Gorheesakal

अकोला - महिलांवरील सर्व प्रकारचे अत्याचार रोखण्यासाठी समाजाचा सहभाग वाढवून नागरिकांचे नितीधैर्य वाढविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी अकोला येथे व्यक्त केले.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी त्या बोलत होत्या. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना शुन्यावर आणण्यासाठी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत.

त्यासोबतच समाजाचा सहभाग वाढवून, नागरिकांचे नितीधैर्य वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर देण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले पाहिजे, यासाठी अकोला पोलिसांना निर्देश दिले असल्याचे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगितले. साक्षीदार संरक्षण कायद्या अंतर्गत महिलांना संरक्षण देणे, मनोधर्य योजनेचा लाभ देणे, आवश्यकता व मागणीनुसार विशेष सरकारी वकील देणे आदी उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्यात.

महिलांच्या विकासासाठी राज्यात आधीपासूनच योजना राबविल्या जात आहे. केंद्रात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छाशक्ती असल्यानेच हे विधेयक मंजूर झाले आहे. अर्थातच त्याची अंमलबजावणी लगेच होणार नाही, याची जाणीव आहे.

मात्र, पंतप्रधानांनी घालून दिलेल्या आदर्शावर राज्यातील सरकार महिलांच्या विकासासाठी काम करीत असल्याचे त्या म्हणाल्यात. या पत्रकार परिषदेला माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश अग्रवाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com