esakal | जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी

जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जिल्हा जन विकास आघाडीची जिल्ह्यातील सर्वच जागेवर युतीची घोषणा करण्यात आली. ही युती जिल्हा परिषदेच्या राजकारणात दूरगामी परिणाम करणारी असली तरी, या युतीतून रिसोड विधानसभा निवडणूकीची मोर्चेबांधणी समोर येत आहे. या विधानसभेचे भावी राजकारण बदलणार आहे. (Legislative Assembly formation in Zilla Parishad politics)

हेही वाचा: माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नीचे अतिक्रमण


वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीच्या युतीची घोषणा शुक्रवारी (ता.२) अ‍ॅड. नकुल देशमुख यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, माजी मंत्री अनंतराव देशमुख व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये जुनी मैत्री असून, ही मैत्री युती परावर्तित करण्याचे या दोन नेत्यांनी भ्रमणध्वनीव्दारे ठरविले. जिल्हा परिषदेच्या या पोटनिवडणूकीमध्ये जागा वाटपावरून कोणताही वाद न होता व मनामध्ये कुठलाही क्लेष न ठेवता युती झाली. ही वंचितांची युती असून, वंचितांना न्याय देण्यासाठी व बहुजन चेहरा समोर आणण्याकरिता युती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणूकीमध्ये युती जर यशस्वी झाली तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका सुद्धा आपण एकत्रित लढाव्यात, अशी इच्छा नकूल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर वंचितचे उपाध्यक्ष फुंडकर यांनी स्थानिक स्वराज संस्थाच का तर, येणारी विधानसभा निवडणूकही आपण एकत्रित लढू आणि अ‍ॅड. नकूल देशमुख यांनी रिसोड विधानसभा निवणूक लढवावी, असे सुचवितातच अ‍ॅड. नकूल देशमुख यांंनी स्मित हास्य दिले.

हेही वाचा: अकोला जिल्ह्यातील १२.४५ लाख लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!

त्यावरून अ‍ॅड. नकूल देशमुख हे रिसोड विधानसभा लढण्यास इच्छूक असल्याचे दिसून आले. माजी मंत्री अनंतराव देशमुख व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे दोन दिग्गज नेते एकत्रित आल्यास जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. आता हे दोन नेते पुढील रणनिती काय आखतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: सहा महिन्यात ६० हजार वाहनचालकांनी मोडले नियम

विधानसभेसाठी ॲड. नकूल देशमुखांच्या नावाची चर्चा
यापुढे मी स्वत: कोणतेही निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी २१ जुलै २०१९ रोजी करडा येथील समर्थक व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केली होती. त्याचवेळी मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, बाजार समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक रिसोड मतदारसंघातून अ‍ॅड. नकूल देशमुख हे युती करून लढू शकतात किंवा वंचितच्या तिकिटावर लढू शकतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मतपेटीला वंचितची साथ
रिसोड विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर झनक घराण्याच्या तीन पिढ्या वर्चस्व राखून आहेत. मात्र, माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा प्रभावही लक्षणिय आहे. दोन वेळा अनंतराव देशमुख यांना निसटता पराभव पत्कारावा लागला तरी, त्यांना मिळालेली मते दखलपात्र राहिली आहेत. मागील निवडणुकीत या मतदासंघात वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या नंबरची मते घेतली होती. आमदार अमित झनक व अनंतराव देशमुख यांच्यात केवळ अडिच हजार मतांचा फरक होता. यामध्ये अनंतराव देशमुख यांच्या एकगठ्ठा मतात वंचितची भर पडली तर, ॲड. नकूल देशमुख यांच्यासाठी ही युती राजकीय पटलावर दमदार एन्ट्री ठरण्याची शक्यता आहे.

संपादन - विवेक मेतकर

Legislative Assembly formation in Zilla Parishad politics

loading image
go to top