esakal | मोबाईलवर बोलताना वेगात आलेल्या ऑटोच्या अपघातात युवतीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईलवर बोलताना वेगात आलेल्या ऑटोच्या अपघातात युवतीचा मृत्यू

मोबाईलवर बोलताना वेगात आलेल्या ऑटोच्या अपघातात युवतीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंबर्डा बाजार (जि.वाशीम) : घरासमोर भ्रमणध्वनी वर बोलत असलेल्या युवतीला भरधाव वेगातील आॅटोने जोरदार धडक दिल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि. ६ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास धनज बु! येथे घडली. (Woman dies in speeding car accident)

हेही वाचा: गावावर शोककळा; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू


सविस्तर असे की फिर्यादी महेक अजुम शे नईम (वय १६ वर्षे) हिने दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी कारंजा अमरावती रोडवरील घरासमोर उभी होती. तिच्या बाजूलाच असलेल्या बैलगाडी जवळ मृतक कु. मुस्कान शेख नईम ही मोबाईलवर बोलत होती. तेवढ्यात चालक शेख हमीद शेख हसन ह्याच्या भरधाव वेगाने येणाऱ्या ऑटो ने मुस्कान हिला उडविले. बहिणीला भरधाव ऑटोने उडविल्याचे बघताच फिर्यादी महेक अजुम हिने व तिच्या आजीने तिला दवाखान्यात नेले.

हेही वाचा: पार्किंगची व्यवस्था नसताना वाहनांची साेडली हवा


परंतु उपचारादरम्यान तिची जीव गेला .सदर ऑटो चालक शेख हमीद शेख हसन वय ४० याच्या बेसावध व भरधाव वेगाने ऑटो चालविण्यामुळे एका निष्पाप तरुणीला जीव गमवावा लागल्याने भादवी च्या कलम २७९ , ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात रामेश्वर रामचवरे करीत आहे.

हेही वाचा: दोन गटातील एकूण सहा गंभीर जखमी, दोन ट्रॅक्टर नदीत फेकले


Woman dies in speeding car accident

loading image
go to top