काँग्रेसचा नारा भाजप सरकार हद्दपार करा : राहुल बोंद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress,BJP

काँग्रेसचा नारा भाजप सरकार हद्दपार करा : राहुल बोंद्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणार (जि. बुलडाणा) : भाजप सरकारच्या विरोधात काँगेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात व काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश श्रीराम मापारी, नगरपरिषद गटनेते भूषण मापारी व शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या मागर्दशनात लोणार शहरातून सकाळी ८ वाजता जामा मस्जिद चौकातून भारुड पथकाच्या उपस्थित आंदोलन रॅलीला सुरवात करण्यात आली.

हेही वाचा: IND vs NZ : रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी

रॅली जैन मंदिर चौक, पुतळाबाई शाळा, मापारी वेटाळ मधून बसस्थानक परिसरात विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, व्यापारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. यानंतर समारोपीय सभेत जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी, केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठे मोठे आश्वासन दिले. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी अनेक योजना आणू त्यांना त्या योजनांमध्ये खूप मोठ्या सवलती देऊ आणि खोट्या आश्‍वासनाने देऊन सत्ता मिळवली आणि सत्तेत आल्यानंतर मात्र सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे पार कंबरडेच मोडले.

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व योजनांची सबसिडी बंद झाली. १०० वेळा पेट्रोल, ९६ वेळा डिझेल तर ७ ते ८ वेळा गॅसचे भाववाढ झाली. या सर्वसामान्य जनतेला भूलथापा मारणार्‍या सरकारने २३ लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोलमधून नफा कमिवला. हे तानाशाही सरकार हद्दपार करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनतेच्या हक्कासाठी जनआंदोलन सुरू केली आहे. तानाशाही सरकार हद्दपार करा हाच काँग्रेस पक्षाचा नारा असे यावेळी बोलताना म्हणाले.

आंदोलनाची सुरवात ही लोणार सारख्या वैज्ञानिक व भौगोलिक महत्त्व लाभलेल्या ठिकाणापासून करण्यात आली. शेकडो नागरिकांची उपस्थिती हेच सांगते की त्यांच्या केंद्र सरकारवर किती असंतोष आहे हे सरकार लवकरच देशातून हद्दपार होईल. यावेळी काँग्रेस नेते लक्ष्मण घुमरे, जिल्हापरिषद अध्यक्षा मानिषाताई पवार यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा: 'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी

यावेळी विधानसभा नेते अ‍ॅड. अनंतराव वानखडे, सहप्रभारी दिलीपराव भोजराज, नगरपरिषद अध्यक्षा पुनमताई पाटोळे, उपाध्यक्ष बादशहा खान, गटनेते भूषण मापारी, तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष नितीन शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, नगरसेविका जोत्स्ना गुलाबराव सरदार, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तौफिक कुरेशी, नगरसेवक संतोष मापारी, आबेद खान पठाण, शेख रुउफ शेख रमझान, रमझान परसुवाले, प्रा. गजानन खरात, गुलाबराव सरदार, सतीश राठोड, अरुण जावळे, एजाज खान, संजय चव्हाण, पंढरी चाटे, शेख समद शेख अहमद, पुरुषोत्तम घायाळ, नानासाहेब खंदारे, भारत राठोड, शालीक घायाळ, गणेश घायाळ, शेख करामत, शाम राऊत, अझीम कुरेशी, भवानी मापारी, सागर मापारी, शेख जुनेद शेख करामत, गोलू अवसरमोल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गजानन खरात यांनी केले.

भारुडातून केला महागाईचा विरोध

केंद्र सरकार ने लावलेल्या सर्वसामान्य जनतेच्या लूट बाबत भारुडातून विरोध करत केंद्र शासन सर्वसामान्यांवर कसा अन्याय करत आहे याबाबत सांगण्यात आले. यावेळी चौकाचौकात मागर्दशन करून केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात.

loading image
go to top