esakal | शिधापत्रिकाधारकांच्या माथी किडलेला मका

बोलून बातमी शोधा

रेशन दुकानातील सडका मका खायचा कसा?

रेशन दुकानातील सडका मका खायचा कसा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला : कोरोना आणि त्यायोगे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त ग्रामस्थांना रास्त भाव धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब लाभार्थी त्रस्त झाले आहेत.

ग्रामीण भागात शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ व मका दिला जात आहे. त्यापैकी मक्याचा दर्जा मात्र अत्यंत निकृष्ट आहे. कुजलेला, सडलेला व किडलेला मका शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारला जात आहे. या संदर्भात तक्रार करूनही त्याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गेल्या काही महिन्यापासून या तालुक्यात सातत्याने निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत केले जात आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या ग्रामस्थांना हे निकृष्ट धान्य घेतल्या शिवाय पर्याय सुद्धा नाही. कोरोनामुळे आधीच जीवनावश्यक वस्तुचे भाव प्रचंड वाढले आहेत. महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठिण झाले आहे. त्यातच मागील काही महिन्यापासून रास्त भाव धान्य दुकानातून विक्रीसाठी आलेल्या गहू व मका मोठ्या प्रमाणात खडे, माती भेसळयुक्त असल्याचे आढळून आले आहे. शासनाने या प्रकाराची चौकशी करुन जनसामान्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

-------------

गत काही दिवसांपासून भेसळयुक्त धान्याचे वाटप होत आहे. मका व गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा येत आहे. जनसामान्यांची थट्टा थांबवून दर्जेदार धान्याचे वाटप करण्यात यावे.

- सतिश गवई, ग्रामस्थ, खापरवाडा, ता. मूर्तिजापूर.