esakal | आणखी १३ रुग्णांचा मृत्यू; २८८ नवे रुग्ण आढळले
sakal

बोलून बातमी शोधा

आणखी १३ रुग्णांचा मृत्यू; २८८ नवे रुग्ण आढळले

आणखी १३ रुग्णांचा मृत्यू; २८८ नवे रुग्ण आढळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे (Corona Virus) होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी १३ रुग्णांचा मंगळवारी (ता. २५) मृत्यू झाला. त्यासोबतच कोरोनाचे २८८ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ५२८ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. (Corona patient deaths and patient statistics in Akola district)

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. २५) जिल्ह्यात १ हजार ४३७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १६३ अहवाल पॉझिटिव्ह तर १ हजार २७४ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरिक्त रॅपिडच्या चाचणीत १२५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांमध्ये २८८ नव्या रुग्णांची भर पडली.

हेही वाचा: सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

आरटीपीसीआरच्या चाचणीत (RTPCR Test) पॉझिटिव्ह आलेल्या १६३ जणांमध्ये ७५ महिला व ८८ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर येथील १९, अकोट-२०, बाळापूर-२३, तेल्हारा-०६, पातूर-०५, अकोला ग्रामीणमध्ये २८ तर मनपा क्षेत्रात ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

असे आहेत मृतक
दहिहांडा येथील ७० वर्षीय पुरुष, पातूर येथील ५३ वर्षीय महिला, मूर्तिजापूर येथील ३५ वर्षीय पुरुष, भौरद येथील ५१ वर्षीय पुरुष, कारली ता. मूर्तिजापूर येथील ५७ वर्षीय पुरुष, खानापूर ता. पातूर येथील ८० वर्षीय पुरुष, शास्त्री नगर येथील ७१ वर्षीय महिला, मोठी उमरी येथील ८६ वर्षीय महिला, मलकापूर येथील ६९ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६० वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुषाचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यासोबतच बाभुळगाव ता. पातूर येथील पुरुष, सिंधखेड येथील ३५ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५४२५७
- मयत - १०२८
- डिस्चार्ज - ४७३५४
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५८७५


संपादन - विवेक मेतकर

Corona patient deaths and patient statistics in Akola district