कोरोना कहर: आणखी १० जणांचा बळी; ६५४ नवे पॉझिटिव्ह

मृत्यू सत्र थांबता थाबेना!
कोरोना कहर: आणखी १० जणांचा बळी; ६५४ नवे पॉझिटिव्ह

अकोला ः कोरोना संसर्गामुळे Corona infection मृत्यूचे सत्र दीड महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. त्यात मंगळवारी मृत झालेल्या आणखी १० जणांची भर पडली. मंगळवारी कोरोना तपासणीचे १८५४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४४५ अहवाल निगेटीव्ह होते. ४१३ आरटीपीसीआरचे पॉझिटिव्ह तर रॅपिड ॲन्टिजेनचे २४१ अशा एकूण ६५४ नव्या रुग्णांची भर पडली. मंगळवारी ५५२ जणांनी कोरोनावर मात केली.

मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआरचे ४१३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १७२ महिला व २४१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर ५९, अकोट- नऊ, बाळापूर-५१, तेल्हारा-पाच, बार्शीटाकळी-२९, पातूर-५०, अकोला-२१०. (अकोला ग्रामीण-४०, अकोला मनपा क्षेत्र-१७०) आदी रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल (ता.१०) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात २४१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

कोरोना कहर: आणखी १० जणांचा बळी; ६५४ नवे पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

बरे होणाऱ्यांची संख्या समाधानकारक

मंगळावारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, केअर हॉस्पिटल येथील चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथील १३, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील आठ, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, लोहाना हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील २८, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, सहारा हॉस्पिटल येथील दोन, इंदिरा हॉस्पिटल येथील एक, फातेमा हॉस्पिटल येथील दोन, अवघते हॉस्पिटल येथील तीन, अर्थव हॉस्पिटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, उशाई हॉस्पिटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ४४५ असे एकूण ५५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे.

कोरोना कहर: आणखी १० जणांचा बळी; ६५४ नवे पॉझिटिव्ह
न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

साडेसहा हजारांवर रुग्णांवर उपचार

अकोला जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या साडेसहा हजारांच्यावर पोहोचली आहे. सध्या सहा हजार ५३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संपादन- विवेक मेतकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com