जागतिक योग दिनावर कोरोनाचे संकट; या ठराविक ठिकाणी व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा होणार दिन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहे.

अकोला : कोवीड 19 या साथरोगामुळे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित आयोजित न करता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शहरातील योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थाद्वारा नाविन्यपूर्ण आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. त्याअनुषंगाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने रविवार 21 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनी शहरातील उंच इमारतीच्या छतावर तज्ज्ञ योग साधक त्यांचे साधकासह उपस्थित राहुन योगाचे प्रात्याक्षिके करतील व ध्वनीक्षेपणाद्वारे माहिती देतील.

महत्त्वाची बातमी - या जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाकडून सुरू झाली वेगळीच मोहीम

त्यानुसार त्या परिसरातील इमारतीच्या टेरेस, गॅलरी व परिसरामध्ये प्रत्येक नागरिकांनी तज्ज्ञ योग साधकाच्या दिशा निर्देशानुसार व आयुष मंत्रालयाच्या https://youtu.be/zllkkMDBfdM या लिंक मध्ये दिलेल्या प्रोटोकॉलनुसार वैयक्तिक स्वरुपात शासनाने व प्रशासनाने कोविड 19 या साथरोगा बाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावयाचे आहे. तथापि शहरातील ज्या भागात वरील योग प्रात्याक्षिके व ध्वनीक्षेपकाची सुविधा उपलब्ध राहणार नाही अशा भागात नागरीकांनी आपल्या इमारतीचे टेरेसरवर, घरात मोकळ्या जागेत योगसाधना करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा.

या ठिकाणी साजरा होणार योग दिन
महावैष्णवी रेसीडेंसी क्रमांक 6, जवाहरनगर चौक,
अरविंद जोग, विश्वास योग व निसर्गपोचार केंद्र

राजरत्न रेसीडेंसी डॉ. फडके हॉस्पीटलजवळ, जवारनगर चौक
माया भुईभार, अजिंक्य योग वर्ग रामदासपेठ.

यत्नशिल अपार्टमेंट न्यू भागवत प्लॉट,
मनिषा गिरीश नाईक, चैतन्य योग फाउंडेशन

गिता भवन, शिवाजी पार्क समोर
संदीप बाहेती.

सिद्धेश्वर गणराया अपार्टमेंट, सिध्दीविनायक मंदीरासमोर
शुभांगी वझे व डॉ. गजानन वाघोडे, बालशिवाजी योग वर्ग

कुसुवंत अपार्टमेंट, मोहिते प्लॉट, मारोती मंदीराजवळ
प्रशांत उंबरकर गुरुजी

मुरलीधर टॉवर, बाराजोर्तिलिंग मंदीराजवळ
श्वेता बेलसरे

राजेंद्र रेसीडेंसी, गजाननपेठ, उमरी, अकोला
निता शरद भागवत, (युथहॉस्टेल ऑफ इंडिया अकोला युनिट)

जुने छाया मंगल कार्यालय, एलआयसी ऑफीस
स्फुती योगा, सौरभ भालेराव

हिम्मतलाल ब्रदर्स इमारत, जुना शितला माता मंदिराजवळ
प्रशांत वाहुरवाघ, अविनाश वतसकर अजिंक्य फिटनेस पार्क सुहास काटे, पतंजली योग समिती

फडकेनगर हनुमान मंदिराचे मागे
पुरुषोत्तम आवळे, पतंजली योग समिती

याप्रमाणे शहरातील विविध भागात नाविण्यपूर्ण योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक भागात नाविण्यपुर्ण योग दिन साजरा होण्यासाठी इमारती तसेच प्रशिक्षक/संस्थांची तयारी असल्यास अशा योग प्रशिक्षकांनी अधिक माहितीसाठी धनंजय भगत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus crisis on World Yoga Day in akola district