आ. महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल; शिवजयंतीनिमित्त काढली होती दुचाकी रॅली

रॅलीच्या माध्यमातून साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन
आ. महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल; शिवजयंतीनिमित्त काढली होती दुचाकी रॅली
आ. महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल; शिवजयंतीनिमित्त काढली होती दुचाकी रॅली

चिखली : शिवजयंती निमित्त शहरातून महिलांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. परंतु या रॅलीच्या माध्यमातून साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आ. महालेंसह सुमारे ३५ जणांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने १९ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास चिखली शहरांमधून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. आ.महालेंसह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मात्र कोरोना प्रोटोकॉलचा आधार घेत चिखली पोलिसांनी या रॅलीला परवानगी नसल्याचे कारण सांगून रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत.

विनापरवाना मोटारसायकल व स्कुटी रॅली काढून जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे जमावबंदी आदेशाचे व महाराष्ट्र शासनाचे कोव्हीड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधितांवर पोलिसांनी लावला आहे. यामध्ये आ. महाले, जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योती खेडेकर, माजी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, माजी नगरसेविका संगीता गाडेकर, मीनल गावंडे, नेहा खरात, तेल्हारा ग्राम पंचायत सरपंच किरण गाडेकर, विजया खडसन, सुरेखा पडघान, मनीषा सपकाळ यांच्यासह अनिकेत सावजी,अमोल खेडेकर व इतर ३० ते ३५ स्कुटी चालक महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांवर कलम १८८, २६९, २७० आयपीसी यासह कलम ३ साथरोग प्रतिबंधक अधिनियम, १३५ अंतर्गत ही कारवाई चिखली पोलिसांनी केली आहे.

कितीही गुन्हे दाखल झाले तरी ते आनंदाने स्वीकारू

छत्रपती शिवरायांना अभिवादन करत असताना कितीही गुन्हे दाखल झाले तरी ते आनंदाने स्वीकारू अशी प्रतिक्रिया सरपंच किरणताई गाडेकर यांनी दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने चिखली शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. साथ रोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी या रॅलीत सहभागी महिला लोकप्रतिनिधींवर चिखली पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या रॅलीमधे महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्ष संघटनांच्या महिला पदाधिकारी व शिवप्रेमी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सगळीकडे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना जिजाऊंच्या जिल्ह्यात याच लेकींवर प्रशासन केवळ महिला एकत्र येऊन अभिवादन करत आहेत या कारणांनी गुन्हे दाखल करत असतील तर हा प्रकार निंदनीय असल्याचेही म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com