जावयाने केली सासू व मेव्हणीची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Mangrulpir son in law killed mother in law and sister in law akola
जावयाने केली सासू व मेव्हणीची हत्या

जावयाने केली सासू व मेव्हणीची हत्या

मंगरुळपीर : तालुक्यातील शेलुबाजार येथे संपतीच्या वादातून जावयाने सासू व मेव्हणीवर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना १३ मे रोजी सकाळी घडली़ या हत्याकांडानंतर पसारहोण्याच्या बेतात असलेला आरोपी जावाई सचिन धर्मराज थोरात (वय ४२) याला पोलिसांनी गजाआड केले़ निर्मलाबाई भिकाजी पवार (६५) व विजया बबबनराव गुंजावळे असे या घटनेतील मृत मायलेकीचे नाव आहे़. या थरारक दुहेरी हत्याकांडामुळे शेलुबाजारसह परिसरात दहशतीचे वातावरण आहे़.

प्राप्त माहितीनुसार, या घटनेतील आरोपी सचिन थोरात (४२) हा कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे़ तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे वास्तव्यास असलेली विजया गुंजावळे ही निर्मलाबाई पवार यांची मोठी मुलगी काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती़ दरम्यान, घटनेच्या दिवशी दोघी मायलेकी घरात असताना पुण्यावरुन शेलुबाजार येथे आलेल्या सचिन थोरात हा पवार यांच्याकडे आला़ यावेळी त्याने वाद घालून सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने दोघी मायलेकीवर सपासप वार केले़.

या हल्ल्यात दोघी मायलेकीचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच एपीआय मंजुषा मोरे, एएसआय अनिरुद्ध भगत, हेकॉ ज्ञानेश्वर राठोड, पोकॉ संदिप खडसे,गोपाल कव्हर,अंकुश मस्के यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविले़ या दुहेरी हत्याकांडानंतर पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेत गजाआड करण्यात आले़ आरोपीवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, ही घटना संपतीच्या वादातून घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार सुनील हुड यांचे मार्गदर्शनात एपीआय मंजुषा मोरे करीत आहेत़.

Web Title: Crime News Mangrulpir Son In Law Killed Mother In Law And Sister In Law Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top