पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत युतीचा विचारही मनात नाही; मात्र...

chandrakant patil
chandrakant patilsakal
Updated on: 

अकोला : पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत युतीचा विचारही मनात नाही. त्यामुळे सध्या तरी स्वबळावरच आगामी निवडणुका भाजप लढविणार आहे. माणूस आशेवर जगत असल्याने भविष्यात काहीही होऊ शकते. मात्र, कार्यकर्त्यांना मला संभ्रमात ठेवायचे नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. ३) अकोला येथे व्यक्त केले.

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले चंद्रकांत पाटील यांनी बुलडाणा दौऱ्यावर जाण्यापूर्वी अकोला येथे भाजप पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, आमदार व कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांसोबत बोलताना त्यांनी शिवसेनेसोबतच्‍या युतीबाबतचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले.

chandrakant patil
पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

शिवसेनेने सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युतीचा कोणताही विचार नाही. सध्या तरी आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावरच लढणार आहे. कार्यकर्त्यांना मला संभ्रमात ठेवायचे नाही. ही जागा लढायची की नाही ही द्विधा मनःस्थिती संपवून त्यातून कार्यकर्त्यांना बाहेर काढ्याचे आहे, असे पाटील म्हणाले.

पाच जिल्हे सोडून निवडणुका

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण झाल्याने पाच जिल्ह्यातील निवडणूक घेता येणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार इतर जिल्ह्यात ५० टक्केच्या आत आरक्षण ठेवून निवडणूक घेता येणार आहे. ओबीसीतील जातींच्या समावेशाबाबत कोणतीही अडचण नाही. ५० टक्केच्या आता आरक्षण असल्यास निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

झोप उडाली नसेल तर कशाला लक्ष देता!

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पाटील यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, तुमची झोप उडाली नसले तर कशाला लक्ष देता. माझ्या म्हणण्याने अस्वस्थ होत नसाल तर लक्ष देऊच नका, असे ते म्हणाले.

chandrakant patil
अकोला : जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी थकबाकी मुक्त

मराठ्यांना मागास सिद्ध करूनच आरक्षण

मराठा समाजाला मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यंत्रणा कामी लावून सात महिन्यांत हे काम केले होते. आताच्या सरकारला त्यासाठी चार वर्षे लागतील, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

राजू शेट्टींना सोबत घेण्याचे संकेत

राजू शेट्टी हा आमचा जुना मित्र आहे. मी त्याला नेहमी ‘लक्ष्मीचा नवरा’ म्हणत होतो. मात्र, उटसूट मोदींवर ते टीका करीत होते. मोदी हे आमच्यासाठी पितृतुल्य आहे. त्यामुळे शेट्टी दुरावले होते. पुन्हा जवळ येत असेल तर त्यांचे स्वागतच असल्याचे पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com