Unemployment Crisis : हाती पदवी पण नोकरीसाठी वणवण; नोंदणीचा सुकाळ पण नोकऱ्यांचा दुष्काळ
Akola News: पदवीधरांकडे शिक्षण असूनही नोकरी नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अमरावती विभागात ७.२५ लाख बेरोजगार नोंदणीकृत आहेत, तर लाखो अद्यापही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.
अकोला : पदवीधरांना इंग्रजी येत नसल्याने नोकऱ्या मिळत नसल्याचे नीती आयोगाच्या अहवालातून गत महिन्यात समोर आले. पदवीधरांना इंग्रजी येण्यासाठी विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांसोबत सहकार्य वाढविण्याची शिफारस आयोगाने केली आहे.