Ladki Bahin Yojana : २० हजार ‘लाडक्या बहिणीं’च्या साड्या पडून; अंत्योदय कार्डधारक महिलांना साड्या वाटपाचा टक्का वाढेना
Women Empowerment: राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील महिलांना साडी देण्याची घोषणा केली होती, मात्र मार्चमध्ये सुरू झालेल्या साड्यांच्या वाटपात अजूनही २०,००० महिलांना साड्या मिळालेल्या नाहीत.
अकोला : राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना साड्याचे गिफ्ट देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सरकारी गोदामात होळीपूर्वीच साड्या दाखल झाल्या. त्यानंतर मार्चमध्ये साड्यांचे वाटपही सुरू झाले.