esakal | कोव्हिशिल्ड लसींचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरणात खोळंबा
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणात महावितरण आघाडीवर

कोव्हिशिल्ड लसींचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरणात खोळंबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लसींचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरणात खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांंश लसीकरण केंद्रांवरील लसीकरण ठप्प पडले आहे. (Delay in vaccination due to non-availability of Covishield vaccine)

कोरोनाला हरविण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाशिवाय दुसरा कोणताच उपाय सध्या उपलब्ध नसल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळे सर्वत्र कोरोना लसीकरणाला प्राथमिकता देण्यात येत आहे.

हेही वाचा: शेतकरी झाला करोडपती, सोयाबीन बाजारात न विकता बियाणे करून विकले

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: पाच हजार द्या, मिळवा कोरोना पॉझिटीव्‍ह स्‍वॅब !

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे. जिल्ह्याला कोरोना लसींचा अल्प साठा मिळत असल्याने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावत आहे. दरम्यान कोव्हिशिल्ड लसींचे डोस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहिम पुन्हा एकदा प्रभावित झाली आहे.

Delay in vaccination due to non-availability of Covishield vaccine

loading image
go to top