धोका वाढला! गडचिरोली जिल्ह्यात ६ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद

delta plus
delta plusesakal
Updated on: 

गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) तब्बल सहा डेल्टा प्लस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या या नव्या रूपाचे रुग्ण सापडल्याने अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात ५६९ कोरोना तपासण्यांपैकी ८ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच मंगळवारी दोन जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित ३० हजार ६८९ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९ हजार ९१५ वर पोहोचली आहे. तसेच सध्या २८ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ७४६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.०९ टक्के तर मृत्यू दर २.४३ टक्के झाला आहे. दरमहा काही नमुने तपासणीसाठी पुणे येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. यातील सहा नमुने कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लसचे आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

delta plus
‘नारायण राणे यांना शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपने सोडले’

या अहवालांमध्ये चामोर्शी तालुक्यात ३, गडचिरोली १ व अहेरी तालुक्यात २ रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत आरोग्य विभागाने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाबाबत दिलेल्या विविध आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी नागरिकांनी करावी, असे आवाहनही विभागाने केले आहे. नवीन ८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३, चामोर्शी तालुक्यातील २, मुलचेरा तालुक्यातील २, सिरोंचा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com