‘नारायण राणे यांना शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपने सोडले’

‘नारायण राणे यांना शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपने सोडले’
Updated on: 

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याची अकोल्यात शिवसैनिकांनी धिंड काढली. मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी एकत्र येत भाजप कार्यालयाकडे कूच केल्याने पोलिसांची तगडा बंदोबस्त होता. भाजप कार्यालयापुढे निदर्शने करीत असताना पोलिसांसोबत शिवसैनिकांची रेटारेटी झाली. राणेंच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे. संतप्त शिवसैनिकांनी मंगळवारी जुने शहरातील जयहिंद चौकातून गांधी रोडवरील खुले नाट्यगृहासमोरील भाजप कार्यालयापर्यंत राणेंच्या पुतळ्याची धिंड काढली. शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.

‘नारायण राणे यांना शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपने सोडले’
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विदर्भच पर्याय! मदत देण्यात सरकार अपयशी

राणेंचा पुतळा घेऊन भाजप कार्यालयाकडे निघालेल्या शिवसैनिकांना खुले नाट्यगृह परिसरात पोलिसांनी रोखले. यावेळी शहरातील सर्व पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी पोलिस ताफ्यासह व पोलिसांच्या जदतकृती दलाच्या जवानांची तुकडी गांधी रोडवर पोहोचली. भाजप कार्यालयाकडे जाण्यापूर्वीच शिवसैनिकांना रोखण्यात आले. त्यामुळे शिवसैनिक व पोलिसांमध्ये रेटारेटी झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर निदर्शने करून आणि राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी आंदोलनाचा समारोप केला. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

आमदारांकडून राणेंवर टीका

आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली. भाजपने बडबड करण्यासाठीच राणेला सोडल्याचे दोन्ही आमदार म्हणाले. राणेंना शिवसेनेवर भुकण्यासाठी भाजपने सोडल्याचे वादग्रस्त वक्तव्यही आमदार नितीन देशमुख यांनी केले.

‘नारायण राणे यांना शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपने सोडले’
वयाच्या अठराव्या वर्षी ‘प्राक्तन’ कादंबरी गाजली अन्...

गांधी रोड जाम

जयहिंद चौकातून रॅलीने भाजप कार्यालयाकडे कूच केली. रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाल्याने एक तासासाठी गांधी रोडची एक बाजू पूर्णपणे जाम झाली होती. एकाएकी करण्यात आलेल्या या आंदोलनाची माहिती पोलिसांनीही नव्हती. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांच्या गोपनीय शाखेचा फोलपणा त्यामुळे उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com