esakal | बापरे! चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंटवरून पैशांची मागणी?
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे! चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंटवरून पैशांची मागणी?

बापरे! चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंटवरून पैशांची मागणी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: फेक अकाउंटद्वारे लोकांना फसवणे हा नवीन प्रकार नाही. पण याचा फटका खुद्द अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बसला असून याबाबन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना पैशांची मागणी सुध्दा करण्यात येत असल्याने चिंता वाढली आहे. (Demand for money from fake Facebook account in the name of Akola District Collector)

यासंदर्भात सविस्त वृत्त असे की, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून माजी महापौर अश्विनीताई हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांना बनावट अकाउंट वरून जिल्हाधिकारी यांच्या नावावर हा प्रकार घडला आहे. या संदर्भात अखिलेश हातवळणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली असून पोलिस यंत्रणा चौकशी करीत आहे. तसेच हा प्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष सुभाष गादिया यांच्यासोबत सुद्धा घडला असल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

हेही वाचा: शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!

फेसबुक मॅसेंजरवर होतेय चॅटींग

सोशल मीडियावर अनेकदा आपण फेक अकाउंटबद्दल ऐकले वाचले असेल. मात्र, अकोल्यात चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुक अकाउंट बनवून त्याद्वारे पैशांची मागणी करण्यात येत आहे. यासाठी बनावट अकाउंटधारक मॅसेंजरवर चॅटींग करून फसवणूक करीत असल्याचे लक्षात येते.

हेही वाचा: खळबळजनक; पोलिस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर बळजबरी अत्याचार

पाठविला गुगल पे अकाउंट नंबर

पैशांची मागणी करीत असाताना तातडीने काम असल्याचे सांगत १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यासाठी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी गुगल अकाउंटचा क्रमांकही देण्यात आला आहे.

सावध रहा

फेसबुकचा वापर करताना अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे हे धोक्याचे ठरू शकते. कारण सध्या फेसबुकवर फेक अकाउंट्सचा सुळसुळाट झाला असून फेक अकाऊंट कसे ओळखायचे, फेक अकाउंटमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून सावध कसे राहावे, याची माहिती करून घेतली पाहिजे.

हेही वाचा: भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?

फेसबुकवर फेक अकाऊंट कसे ओळखायचे?

आपण जेव्हा एखाद्या फेसबुक प्रोफाईलवर जातो तेव्हा सगळ्यात पहिली दिसणारी गोष्ट म्हणजे प्रोफाईल फोटो. तुम्हाला एखादे अकाउंट फेक असल्याचा संशय असेल तर एक युक्ती करा. फेक अकाउंट काढणारी व्यक्ती कधीच स्वतःचा फोटो प्रोफाईलला लावत नाही.

फेसबुकची टाईमलाईन त्या व्यक्तीबद्दल सगळी माहिती देत असते. ती लक्ष देऊन वाचल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात येतील. ती व्यक्ती कोणत्या पोस्ट टाकते यावरून तुम्ही तिच्याबद्दल अंदाज लावू शकता.

एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधायला येते तेव्हा तिच्यावर विशेष लक्ष द्या. म्हणजे ती व्यक्ती तुमच्याशी प्रमाणापेक्षा जास्त बोलत असेल, किंवा तुम्ही तुमच्याबद्दलच्या तिला न सांगितलेल्या गोष्टी तिला माहित असतील तर ती व्यक्ती तुम्ही ओळखत असलेल्या व्यक्तींपैकी आहे.

फेसबुकवर अकाउंट उघडताना आपल्याला आपला मोबाईल नंबर किंवा मेल आयडी विचारला जातो. तो दिल्यानंतर आपण तीच व्यक्ती आहोत ही खात्री पटावी म्हणून नंबरवर किंवा मेल द्वारे एक वन टाईम पासवर्ड पाठवून त्याद्वारे ओळख नक्की केली जाते.

या सगळ्या पद्धतींनी ते अकाउंट नक्की कुणाचे आहे याचा अंदाज फक्त बांधता येतो. पण हीच ती व्यक्ती आहे असे ठामपणे सांगता येत नाही.

संपादन - विवेक मेतकर

Demand for money from fake Facebook account in the name of Akola District Collector

loading image
go to top