esakal | योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी

Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि.वाशिम) ः शहरातील योगेश रामचंद्र बळी यांनी प्रथम देशी गाईचा व्यवसाय सुरू केला. आता या गाईंच्या दुधापासून निर्मित पेढ्याला राज्याबाहेर सुद्धा मागणी आहे. डी.एड.चे शिक्षण घेतलेल्या योगेशने शिक्षक होण्याऐवजी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये यश प्राप्त केले आहे. (Demand for Yogesh's sweets across the state as well as outside the state)

हेही वाचा: ॲड. प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुटीवर

योगेशच्या वडिलांचा दूध डेअरीचा व्यवसाय सुरू होता. त्या व्यवसायाशी संलग्न दुधाची वेगवेगळी उत्पादने तयार करण्याचा निर्णय योगेशने घेतला. गुगलवर सर्च करून व इतर ठिकाणी चर्चा करून त्याने सुरुवातीला पेढे तयार करण्यास सुरुवात केली. त्याच्या दर्जामुळे त्याची मागणी वाढली राज्यात व राज्याबाहेर त्याची विक्री सुरू आहे. मालेगाव शहरात त्याचे दूध संकलन व दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे केंद्र आहे. त्याची संकलन केंद्रे मेडशी, राजूरा व मालेगाव येथे आहेत. दूध संकलनासाठी डेअरीचे वाहन आहे.

हेही वाचा: पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, पती व सासू विरुद्ध गुन्हा

cow

cow

सुमारे २५० देशी गाईंचे दूध, उत्पादक येथे देतात. सुमारे ७०० लिटर दूध संकलित केले जाते. योगेशने त्यंच्या प्रक्रिया पदार्थांची विशेष ओळख तयार केली आहे. रवेदार तुपाची निर्मिती, ताज्या दह्याची निर्मिती, पेंढ्यासोबत केली जाते. या व्यवसायाचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. दूध उत्पादकांचे दूध लगतच्या गावातच संकलित होऊ लागले. त्यामुळे वाहतुकीचा भार कमी झाला. शासकीय खरेदी सुरू-बंद असली तरी, ‘ढवळेश्वर डेअरी’ची खात्रीची बाजारपेठ त्यांना मिळाली. या डेअरीमध्ये पेढा, पनीर, दही, खवा, तूप, श्रीखंड, आम्रखंड इत्यादी पदार्थ मागणीनुसार तयार केले जातात. पेढा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यंदा दिवाळीत चार दिवसात सात क्विंटलची विक्री झाली. दुधाला आधीच लौकिक मिळवला आहे.

हेही वाचा: कोरोनाने केले 10 बालकांना अनाथ, बुलडाणा जिल्ह्यात बांधीत वाढले

मालेगाव हे ठिकाण औरंगाबाद-नागपूर महामार्गावर असल्याने अनेकजण येथे थांबून आवर्जून पेढा खरेदी करतात. या ठिकाणावरून आंध्रप्रदेशातही वाहने जातात. त्या ठिकाणचे ग्राहक जुळले आहेत. सहा रुपये प्रतिफॅट प्रमाणे दुधाचा दर ठरविला जातो. दर दहाव्या दिवशी शेतकऱ्यांना चुकारे मिळतात. प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रसामग्री आपल्याच पैशातून खरेदी केली. त्यासाठी कोणते कर्ज काढावे लागले नाही. बळी कुटुंबाचा दिवस पहाटे पाच वाजताच सुरू होतो. रात्री १० वाजेपर्यंत रामचंद्र बळी, योगेश व कर्मचारी सतत कार्यरत असतात. दूध संकलन, वाहतूक, उत्पादन आदी मिळून १० ते १२ तरुणांना नोकरीपेक्षा व्यवसायात उतरून इतरांना नोकरी दिल्याचा आनंद योगेश यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकतो.


दूध ‘एटीएम’चा संकल्प
येत्या काळात मालेगावमधील ग्राहकांना घरपोच दूध देण्याचा उपक्रम सुरू करणार असून, ‘एटीएम’ दूध यंत्र, फिरते वाहन सुरू करण्याचा विचार असल्याचे योगेश यांनी सांगितले. दैनंदिन ग्राहकांची माहिती संकलन, चुकाऱ्याची पद्धत, अशा विविध बाबींवर सध्या विचार सुरू आहे.

महिन्याला १२ ते १४ लाख रुपयांची उलाढाल
यापूर्वीही केवळ दूध विक्री सुरू असताना त्याच्या दर्जात कोणतीही तडजोड केली नाही तसेच
प्रक्रिया पदार्थाच्या दर्जातही कुठली तडजोड ठेवली नसल्याचे योगेश अभिमानने सांगतात. गेली ३० वर्षे उत्कृष्ट दूध पुरवित असल्यानेच ग्राहकांचा विश्वास संपादन करता आला. आजवर विश्वासाला तडा जाऊ दिला नसल्याचे ते सांगतात. पुरवठ्यात सातत्य दर्जा पदार्थाचा ताजेपणा ते ठेवतात. त्यांची प्रतिमहिना १२ ते १४ लाख रुपयांची उलाढाल आहे. जिद्द, चिकाटी व व्यवसायाशी प्रामाणिकता ठेवल्याने यश मिळाल्याचे योगेश बळी सांगतात.

संपादन - विवेक मेतकर

Demand for Yogesh's sweets across the state as well as outside the state

loading image