esakal | पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, पती व सासू विरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

 woman-crying.jpg

पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, पती व सासू विरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोताळा : पतीला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत 25 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी पती व सासू विरुद्ध बोराखेडी पोलिसांनी बुधवारी (ता.7) गुन्हा दाखल केला आहे. (Marital harassment for Rs 5 lakh, crime against husband and mother-in-law)

हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; निवडणुकीचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात

याबाबत अनिता सूरज कांबळे (वय 25 वर्ष, रा. शेलापूर खुर्द) या विवाहितेने बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, तिचा विवाह सूरज दशरथ कांबळे यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर पीडित विवाहिता पती व सासू सोबत बेलापूर नवी मुंबई येथे राहत होती. दरम्यान, पती सूरज दशरथ कांबळे (वय 33 वर्ष) व सासू मंदाबाई दशरथ कांबळे (वय 62 वर्ष, दोघे रा. पोलिस लाइन, बेलापूर नवी मुंबई) यांनी संगनमत करून पतीला चारचाकी गाडी घेण्यासाठी पीडित विवाहितेला माहेरवरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

हेही वाचा: बाजार समितीतील व्यवहार तिसऱ्या दिवशीही बंद

तू मोठ्याने बोलत नाही. तू तोतरी आहे, असे म्हणून मारहाण करीत त्रास दिला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकार 5 मार्च 2019 ते 8 जून 2019 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी पती सूरज दशरथ कांबळे व मंदाबाई दशरथ कांबळे या दोघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ प्रल्हाद वानखेडे व पोकाँ ज्ञानेश्वर धामोडे करीत आहेत.

Marital harassment for Rs 5 lakh, crime against husband and mother-in-law

loading image