esakal | ‘कोरोना’सोबतच आता ‘नाकतोड्यांची’ धास्ती; पिकांचा कर्दनकाळ ‘वाळवंटी टोळ’ विदर्भात
sakal

बोलून बातमी शोधा

Toldhad.jpg

वाळवंटी टोळ ही कीड मोठ्या प्रमाणात पिकांचे व इतर वनस्पती झाडाझूडपांचे नुकसान करते. सध्या राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यामध्ये या बहुभक्षीय किडीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. या आधी सन 1926 ते 1931 मध्ये, 1949 ते 1955, 1962, 1978 व 1993 मध्ये सुध्दा या किडीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. या टोळधाडीने विदर्भात धडक दिली असून, नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले आहे. सध्या विदर्भात हंगामी पीक नसलं तरी, भाजीपाला आणि संत्रा, मोसंबी, लिंबू या झाडांच्या बागा उभ्या आहेत. त्यांना टोळांनी लक्ष्य केलं आहे. सध्या या टोळची दिशा नागपूर, गोंदिया, भंडारा अशी आहे. परंतु, ही टोळ हवेच्या दिशेने प्रवास करत असून, हवेची दिशा कधीही बदलू शकते. त्यांमुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसह पश्चिम विदर्भ, मराठवाडा येथील शेतकऱ्यांनी सुद्धा या टोळधाडीची धास्ती घेतली आहे.

‘कोरोना’सोबतच आता ‘नाकतोड्यांची’ धास्ती; पिकांचा कर्दनकाळ ‘वाळवंटी टोळ’ विदर्भात

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : ‘कोरोना’मुळे आधिच सर्वजण धास्तावलेले आहेत. त्यात भर म्हणजे आता पिकांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या वाळवंटी टोळधाडीने विदर्भात शिरकाव केला असून, प्रचंड नुकसान सुद्धा केले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना या टोळधाडीची (नाकतोड) धास्ती लागली असून, सतर्कता म्हणून शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करण्याचा सल्ला, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी दिला आहे.

वाळवंटी टोळ ही कीड मोठ्या प्रमाणात पिकांचे व इतर वनस्पती झाडाझूडपांचे नुकसान करते. सध्या राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यामध्ये या बहुभक्षीय किडीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. या आधी सन 1926 ते 1931 मध्ये, 1949 ते 1955, 1962, 1978 व 1993 मध्ये सुध्दा या किडीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. या टोळधाडीने विदर्भात धडक दिली असून, नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले आहे. सध्या विदर्भात हंगामी पीक नसलं तरी, भाजीपाला आणि संत्रा, मोसंबी, लिंबू या झाडांच्या बागा उभ्या आहेत. त्यांना टोळांनी लक्ष्य केलं आहे. सध्या या टोळची दिशा नागपूर, गोंदिया, भंडारा अशी आहे. परंतु, ही टोळ हवेच्या दिशेने प्रवास करत असून, हवेची दिशा कधीही बदलू शकते. शिवाय लवकरच विदर्भात खरीप हंगाम सुरू होणार आहे. त्यांमुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसह पश्चिम विदर्भ, मराठवाडा येथील शेतकऱ्यांनी सुद्धा या टोळधाडीची धास्ती घेतली आहे. याबाबत कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी सुद्धा शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा व टोळधाड प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.


हे ही वाचा : चोर...चोर...चोर..त्याने माझे फेसबुक अकाऊंट चोरले हो...अन् मित्रांना मागतोय पैसे!
 

प्रतिबंधात्मक व्यवस्थापन
शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून, या किडीने त्यांच्या शेतात प्रवेश करू नये याकरिता वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपयायोजना करणे आवश्यक आहेत. त्यासाठी शेताच्या आजुबाजुला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे. निंबोळी आधारित किटकनाशक अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा 5 टक्के निंबोळी अर्काची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हे ही वाचा : शंभर कोटीचा मामला, सरकारी तिजोरीतच थांबला
 

अशी करा उपाययोजना

  • संध्याकाळी/ रात्रीच्या वेळी झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात.अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेठवून तसेच टायर जाळून धूर करावा.
  • 20 किलो गहू किंवा भाताच्या तूसामधे फिप्रोनील 5 एससी, 3 मिली मिसळावे व त्याचे ढिग शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व ही कीड मरण पावते.
  • मिथील पॅराथिऑन 2 टक्के भूकटी 25 ते 30 किलो प्रतिहेक्टरी धुरळणी करावी.

हे ही वाचा : अरे बापरे! सर्वोष्ण शहरांच्या यादीत या शहराचे नाव; जणू काही जगातील उष्णतेचे केंद्र बनन्याकडे...
 

प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास

  • टोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास, क्लोरपायरीफॉस 20 ईसी २४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 ईसी 10 मिली किंवा डेल्टामिथ्रिन 2.8 ईसी 10 मिली किंवा फिप्रोनील 5 एससी 2.5 मिली किंवा ल्यांब्डा सायहेलोथ्रिन 5 ईसी 10 मिली किंवा मॅल्याथिऑन 50 ईसी 37 मिली किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • किटकनाशकांची फवारणी शक्यतोवर रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी करावी.