चोर...चोर...चोर...त्याने माझे फेसबुक अकाऊंट चोरले हो...अन् मित्रांना मागतोय पैसे!

अनुप ताले
Saturday, 30 May 2020

सोशल मीडियाचा आता प्रचंड वापर वाढला असून, जीवनाचा जणू काही तो एक अविभाज्य भागच बनला आहे. त्यावरूनच आप्तजनांसोबत बोलचाल, फोटो, व्हिडीओचे आदान प्रदान होत आहे. एक वेळ सोशल मीडियाचा मुख्य उद्देश मनोरंजन एवढाच असला तरी, तो आता विस्तारीत झाला असून, मनोरंज किंवा संपर्काचे माध्यम म्हणूनच नव्हे तर, कार्यालयीन कामांसाठी  सुद्धा सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. जेवढे या माध्यमाचे महत्त्व वाढत आहे तेवढेच त्यावरील धोके सुद्धा आता वाढत आहेत. सोशल मीडियाचे एखाद्याचे खाते हॅक करून त्याची वैयक्तीक माहिती, फोन नंबर चोरणे, त्या खात्यावरून चुकिची माहिती प्रसिद्ध करणे इत्यादी प्रकार झाल्याचे ऐकण्यात आहेत. आता मात्र चक्क फेसबुक खाते हॅक करून, मुळ खातेदाराच्या परिचितांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे.

अकोला : सावधान...माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. त्यावरून कोणीतरी माझ्या फेसबुक मित्रांना पैशांची मागणी करत आहे. तुम्हालाही माझ्या नावाने कोणी दुसराच व्यक्ती पैशाची मागणी करू शकतो, तेंव्हा अशा मागणीकडे दुर्लक्ष करा आणि कृपया शहानिशा केल्याशिवाय पैसे पाठवू नका...अशी सूचना काहीजण सध्या सोशल मीडियावर करीत असून, त्यांचेमते त्यांचे फेसबुक अकाउंट कोणी दुसरात व्यक्ती वापरत आहे.

 

विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. तुमच्या फेसबुक अकाउंटद्वारे दिवसा ढवळ्या पैशांची चोरी केली जाऊ शकते! हॅकर्स तुमचे फेसबुक अकाउंट हॅक करुन, तुमच्या फेसबुक मित्रांना तुमच्या नावाने मोठ्या रकमेची मागणी करीत असल्याच्या काही घटना निदर्शनात आल्या आहेत. त्याबाबत खुद्द संबंधित फेसबुक खातेदाराने सोशल मीडियावर संदेश टाकून, त्यांचे खाते हॅक झाल्याचे कळविले आहे व त्यांचे नावाने कोणीही पैशाची मागणी करीत असल्यास, पैसे न देण्याची विनंती केली आहे. अकोला तालुक्यात खडकी भागातील अनंता शिंदे यांच्यासोबत असाच प्रकार नुकताच घडला असून, त्यांचे फेसबुक खात्यावरून कोणी दुसऱ्याच व्यक्तीने त्यांच्या मित्रांना मदतीच्या स्वरुपात पैशाची मागणी केल्याचे त्यांनी सांगीतले. शिवाय याबाबतची सर्वांनी दखल घ्यावी व त्यांच्या नावाने कोणी मॅसेजद्वारे पैशांची मागणी करीत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडियावर केले आहे. त्यांनी सतर्कतेच्या आवाहनासोबतच हॅकर्सद्वारे त्यांच्या परिचितांना करण्यात आलेल्या पैशाच्या मागणीचे स्र्कीन शॉट सुद्धा जोडले आहेत. त्यामुळे इतरांनी सुद्धा सतर्क राहण्याची व सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

 

हे ही वाचा : उत्पादकतेसोबतच सोयाबीनची गुणवत्ताही वाढवायची असेल तर करा हे...
 

कोणीतरी दुसराच व्यक्ती करतोय पैशांची मागणी
माझे फेसबुक खाते हॅक करून कोणीतरी त्यावरून माझ्या परिचितांना पैशाची मागणी करीत होते. याबाबत मला माहिती मिळताच मी संबंधित खाते बंद केले व कोणीही अशा प्रकारे माझ्या नावाने पैशाची मागणी करीत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
- अनंता शिंदे, खडकी, अकोला

 

हे ही वाचा : अभिनंदन! तुम्हाला गोंडस मुलगा झाला; मात्र थांबा, तुम्हाला बाळाला भेटता येणार नाही, काय झाले असे?...वाचा
 

अकाउंटचा पासवर्ड मोबाईल क्रमांक नको
फेसबुक अकाउंट हॅक झाल्याबाबतच्या काही दिवसात जिल्हाभरातून तिन ते चार तक्रारी झाल्या आहेत. ज्यांच्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड त्यांचा मोबाईल क्रमांक असतो, अशी फेसबुक खाती प्रामुख्याने हॅक होत असल्याचे निदर्शनात आल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही फेसबुक अकाउंटचा पासवर्ड त्यांचा मोबाईल क्रमांक ठेऊ नये व अशा प्रकारची फसवणूक होत असल्यास सायबर पोलिस विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware of money theft from your Facebook Account