मूर्तिजापुरात लसीकरण केंद्रावर वाद, लसीकरण बंद

मूर्तिजापुरात लसीकरण केंद्रावर वाद, लसीकरण बंद
जालना

मूर्तिजापूर (जि.अकोला) : मूर्तिजापूर शहरातील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center in Murtijapur city) सोमवारी सकाळी लसीकरणादरम्यान वाद (Disputes during vaccination) होऊन लसीकरण ठप्प झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत वाद घालणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा फरार झाला. (Dispute over vaccination center at Murtijapur in Akola, vaccination stopped)


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नगर पालिका परीसरातील लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी ११ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. कोविशिल्डच्या दुसरा डोज देण्याची प्रक्रिया यंत्रणेने सुरू केली. कोव्हॕक्सिनचा दुसरा डोज देण्याची प्रक्रिया साडे अकराला सुरू करताच प्रेम दुबे व सागर दुबे यांनी नोंदणी करणारे हेमंत तायडे यांच्याशी वाद घातला. नोंदणी करताना संबंधितास रांगेतील मागच्या व पुढच्या व्यक्ती विषयी का विचारता? असा सवाल उपस्थित करून अर्वाच्च शिविगाळ केली. उपस्थित नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही शिवीगाळ सुरूच ठेवला.

मूर्तिजापुरात लसीकरण केंद्रावर वाद, लसीकरण बंद
संतापजनक; शाळकरी विद्यार्थ्याकडून कोविड सेंटरच्या टॉयलेटची सफाई

काही वेळाने लसीकरण केंद्रात दाखल झालेल्या दिनेश दुबे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण केली. हा प्रकार उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना कळताच त्यांनी पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. निवासी वैद्यकीय अधिकारी विजय वाडेकर यांच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी तातडीने प्रेम दुबे, सागर दुबे, दिनेश दुबे या तिघांविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रेम व सागर दुबे यांना अटक करण्यात आली असून, दिनेश दुबे फारार झाला. ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आशीष शिंदे पुढील तपास करीत आहेत.

मूर्तिजापुरात लसीकरण केंद्रावर वाद, लसीकरण बंद
आमदारांची 'बाहुबली' स्टाइल, भर रस्त्यावर काढले शर्ट

वादामुळे नागरिकांचा मनस्ताप
कोव्हॕक्सिनच्या लसीकरणासाठी लसीकरण केंद्रात आलेल्या नागरिकांना या प्रकारामुळे प्रचंड मनस्ताप झाला. दुसरा डोज घेण्यासाठी आलेले ४५ वर्षांवरील नागरिक अडीच वाजेपर्यंत उन्हाच्या काहिलीत थांबले. अडीच वाजता त्यांना लसीकरण होत नसल्याचे सांगण्यात आले.

लसीकरणादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण झाली. ज्यांच्यासाठी आरोग्य यंत्रणा राबते त्यांच्याकडूनच मारहाण होत असेल, तर सुरक्षेचे काय? उद्या लसीकरण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
- विलास सोनोने, वैद्यकीय अधीक्षक, एलडीएच, मूर्तिजापूर.

संपादन - विवेक मेतकर

Dispute over vaccination center at Murtijapur in Akola, vaccination stopped

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com