Diwali Festival 2020: झेंडूच्या फुलांना आलाय सोन्याचा भाव!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

यंदा अती पावसामुळे झेंडू फुलांचे उत्पादन कमी झाले असले तरी दिवाळी सणाच्या अनुषंगाने फुल उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. भाव तुलनेने चांगला मिळत असल्याने हे शेतकरी समाधानी आहेत.

अकोला :  यंदा अती पावसामुळे झेंडू फुलांचे उत्पादन कमी झाले असले तरी दिवाळी सणाच्या अनुषंगाने फुल उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. भाव तुलनेने चांगला मिळत असल्याने हे शेतकरी समाधानी आहेत.

यंदा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात अतीवृष्टी झाली. त्याचा फटका फुल उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला. ज्या भागातील फुल शेती या परिस्थितीतही बहरली त्या शेतकऱ्यांना आता कमी उत्पादनातही चांगले उत्पादन मिळण्याची हमी आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जागेवरूनच ८० ते ९० रुपये किलोला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा पावसामुळे झेंडू उत्पादकांचे नुकसान झाले आहे. उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शिवाय यंदा झेंडूची लागवडही कमी आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूचे उत्पादन कमी असल्याने हे शेतकरी चिंतेत होते. परंतु आता दिवाळीच्या काळात दर चांगले मिळत असल्याने झेंडू उत्पादक शेतकरी चिंतामुक्त झाले आहेत.

शेतकरी फुल तोडण्यात व्यस्त
दिवाळी बाजारासाठी झेंडूची फुल विक्री करण्याकरिता गेल्या तीन दिवसांपासून झेंडूची तोडणी जोमाने सुरू आहे. बाजारात विविध रंगी झेंडूच्या फुले आकर्षण बनले आहेत.

दसऱ्यापेक्षा अधिक दर
दसऱ्याला दिवाळीत ५० ते ६० रुपये किलोने शेतकऱ्यांकडून फुलांची खरेदी झाली होती. आता दिवाळीत मात्र दर चांगले मिळत आहेत. जागेवरूनच व्यापारी ८० ते ९० रुपये किलोने खरेदी करीत आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा या बाजारपेठेत पाठविलेल्या मालाला ११० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. बाजारात फुलांना मागणी वाढली असल्याची माहिती फुल उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 News: Gold price has come down to marigold flowers in akola