
अकोला : अकोल्याच्या राजकीय समीकरणांमध्ये सध्या नाट्यमय घडामोडी घडत असून, काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काहीच दिवसांत वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व डॉ. अभय पाटील यांना शिंदे गटाकडून थेट पक्षप्रवेशाची ऑफर मिळाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.