डॉ. साधना जायभाये एम.डी. जिरियाट्रिक्स मेडिसी मध्ये राज्यात पहिली

श्रीमती इंदुमती विश्वनाथ सोनवणी 'गोल्ड मेडल' मिळवले
Dr. Sadhana Jayabhaye
Dr. Sadhana Jayabhaye

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद या ग्रामीण भागामध्ये शिक्षण पूर्ण करून जिजाऊची लेक कु. साधना नारायण जायभाये ह्या लेकीने वैद्यकीय क्षेत्रातील एमडी मध्ये जिरियाट्रिक्स मेडिसीनमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येवुन एमडीचे शिक्षण पूर्ण करून श्रीमती इंदुमती विश्वनाथ सोनवणी 'गोल्ड मेडल' मिळवल्यामुळे जिजाऊच्या लेकीचा डंका राज्यात पहायला मिळत आहे. शेतकरी कुटूंब असतांना घरामध्ये एकही डॉक्टर नसतांना सुध्दा 'गोल्ड मेडल' मिळविण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

डॉ. साधना जायभाये ह्याचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरद शाळेत झाला आहे. इयत्ता पाचवी मध्ये नवोदय परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादित करून चुणूक दाखविली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.इयत्ता ६ वी ते ११ पर्यत माध्यमिक शिक्षणासाठी पालकांनी जवाहर नवोदय विद्यालय शेगांव येथे प्रवेश करून इयत्ता बारावीच्या परिक्षेत चांगले यश मिळविले.

मात्र काही तरी वेगळे करण्याची इच्छा व आई सौ. सुनीता व वडील नारायण यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास उराशी बाळगून डॉ.साधना यांनी सीईटी च्या अभ्यासाची परीक्षेची तयारी सुरू केली. सन २०१२ मध्ये सीईटी परिक्षा दिल्यानंतर मार्क चांगले मिळवल्यामुळे शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी वैद्यकीय शासकीय महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी सन २०१२ मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेवुन यशस्वी अभ्यासक्रम २०१७ मध्ये पूर्ण केला. त्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप केली.

एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून एम. डी. चे शिक्षण घेण्यासाठी सन २०१९ ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे प्रवेश घेतला,त्याठिकाणी एमडी जिरियाट्रिक्स मेडिसीनचा अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून, यात डॉ. साधना जायभाये ह्या राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. यशाचे श्रेय आई वडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया तील प्राध्यापक यांना दिले आहे.

ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेवुन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमबीबीएस पूर्ण केले,त्यानंतर इच्छा शक्तीच्या जोरावर एमडीचे शिक्षण पूर्ण करून गोल्ड मेडल मिळविले आहे.विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून अभ्यास करण्यासाठी गरज आहे.

- डॉ. साधना जायभाये, गोल्ड मेडलिस्ट एमडी जिरियाट्रिक्स मेडिसीन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com