Akola News : अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ‘ड्रेस कोड’; जि.प. शिक्षण समितीच्या सभेत निर्णय

जि.प. शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांमध्ये एकमत
Akola News : अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ‘ड्रेस कोड’; जि.प. शिक्षण समितीच्या सभेत निर्णय
Updated on: 

अकोला : जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वेळेत शिकवण्याऐवजी अनेक शिक्षक दांडी मारत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना एकच ड्रेस कोड लागू करण्यावर शिक्षण समितीचे एक मत झाले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती माया नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १३) जि.प. शिक्षण व क्रीडा समितीची सभा अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वरुड जउळका येथे पार पडली.

यावेळी शिक्षण समितीच्या सदस्यांचे शाळेत आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहात सर्वांचे स्वागत केले. मॉडेल स्कूल म्हणून नावारुपाला आलेली जिल्हा परिषदेचे वरुर जउळका शाळा जिल्ह्याला दिशादर्शक ठरावी यासाठी शिक्षण समितीची सभा याठिकाणी घेण्यात आली.

Akola News : अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ‘ड्रेस कोड’; जि.प. शिक्षण समितीच्या सभेत निर्णय
Akola : पूर्णेच्या पाण्याने राजराजेश्वराला जलाभिषेक

सभेत शिक्षण समिती सभापती माया नाईक यांच्यासह सदस्य रामकुमार गव्हाणकर, स्फूर्ती गावंडे, वर्षा वझीरे, रंजना विल्हेकर, गजानन काकड, डॉ. गणेश बोबडे, प्रमोद फाळके आदी सदस्य उपस्थित होते. सभेचे कामकाज सचिव तथा शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी सांभाळले.

महिला शिक्षिकेची होणार नियुक्ती

बार्शीटाकळी तालुक्यातील धामणदरी येथील शाळेत विद्यार्थीनींसोबत शिक्षकाने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे या प्रमाणे इतर ठिकाणी अप्रिय घटना होऊ नये म्हणून शिक्षण समितीने प्रत्येक शाळेत महिला शिक्षिका नियुक्ती करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. आठवड्यातील एक दिवस दर शनिवारी ज्या शाळेत शिक्षिका नसतील तेथे तात्पुरती नियुक्ती करण्याचे आदेश लवकरच निर्गमित केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Satej Patil statement on Gokul election
Court
CJP founder Abhijit Dipke interacting with villagers during his inspection of a Zilla Parishad school in Ausa taluka, Latur district.
Marathi News Esakal
www.esakal.com