टिप्पर अपघातात चालक-मालकाचा मृत्यू; एक गंभीर | Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिप्पर अपघातात चालक-मालकाचा मृत्यू; एक गंभीर

टिप्पर अपघातात चालक-मालकाचा मृत्यू; एक गंभीर

देऊळगावराजा - पंक्चर काढत असलेल्या उभ्या टिप्परला वाहनाने धडक दिल्याने टिप्पर चालक-मालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना देऊळगावराजा ते चिखली मार्गावर सरंबा फाट्यावर रात्री उशिरा घडली. सदर अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून अपघाताला कारणीभूत संशयित ट्रक देऊळगाव मही पोलिसांनी स्थानबद्ध केला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, चिखली तालुक्यातील विना नंबर वाळू टिप्पर चिखली येथून डिग्रस वाळू घाटाकडे येत असताना पंक्चर झाला. दरम्यान सरंबा फाट्यावर पंचर दुरुस्तीच्या दुकानासमोर सदर विना नंबरचे टिप्पर लावून टायर खोलन्याचे काम सुरू होते. यावेळी टिप्परचा काही भाग रस्त्यावर होता. दरम्यान चिखलीकडून येणार्‍या वाहनाने रस्त्यावर उभ्या टिप्परला जबर धडक दिली. सदर अपघातात राजू कौतिकराव सुरडकर रा. भानखेड व प्रशांत ठेंग रा मकरध्वज खंडाळा तालुका चिखली हे दोघे टिप्पर चालक-मालकाचा जागीच मृत्यू झाला. यात रवी पारीबा इंगळे राहणार भानखेड गंभीर जखमी झाला.

रात्री बाराच्या सुमारास घडलेल्या सदर अपघाताची माहिती मिळताच एएसआय अकील काझी, पोलिस कॉन्स्टेबल सतीश जाधव, प्रवीण तळेकर घटनास्थळी पोहोचले. काही वेळाने परिसरातील टिप्पर चालक अपघातस्थळी पोहोचले व त्यांनी मृतकांच्या नातेवाइकांना माहिती दिली. नातेवाइकांनी मृतदेह चिखली येथे नेण्याच्या निर्णय घेतला तर पोलिसांनी गंभीर जखमी रवी याला जालना येथे हलविले. सदर अपघात प्रकरणात देऊळगाव राजा पोलिसात फिर्याद नसल्याने तसेच मृतदेह चिखली येथे हलविण्यात आल्याने गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता तर संशयाच्या आधारावर देऊळगाव मही पोलिसांनी ट्रक क्रमांक डब्ल्यू. बी 23 ई 4957 वाहन चालकासह ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

हेही वाचा: महिला पोलिसाचा शारीरिक, मानसिक छळ

108 रुग्णवाहिका चालक व नातेवाइकांमध्ये बाचाबाची

अपघात घडल्यानंतर 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पोचली. यानंतर रुग्णवाहिका चालक व मृतकांच्या नातेवाईक यांच्यात वाद झाला. 108 हे वाहन रुग्णवाहिका असून शव वाहिका नाही अशी भूमिका रुग्णवाहिका चालकाची होती तर नातेवाईक आपल्या भूमिकांवर ठाम होते. यावेळी पोलिसांनी समजूत घालून वाद मिटवला.

माहितीसंदर्भात गोंधळ

मृतकाच्या नातेवाइकांनी मृतदेह चिखली येथे घेऊन जाण्याचा आग्रह धरला. त्यावेळी अपघात देऊळगाव मही हद्दीत घडला असला तरी नातेवाइकांच्या भावना लक्षात घेता पोलिसांनी मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली. मात्र, रात्री बारा वाजता घडलेल्या या अपघातास संदर्भात देऊळगाव राजा चिखली दोन्ही पोलिस ठाण्यात शनिवार सायंकाळपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याने अपघात संदर्भात अधिकृत माहिती घेण्याकरिता माध्यमाचे प्रतिनिधींना आपापले वैयक्तिक सोर्स वापरावे लागले.

loading image
go to top