महिला पोलिसाचा शारीरिक, मानसिक छळ | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News
महिला पोलिसाचा शारीरिक, मानसिक छळ

महिला पोलिसाचा शारीरिक, मानसिक छळ

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) - पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अंढेरा पोलिसात विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, 7 नोव्हेंबरला पीडित महिला पोलिस कर्मचार्‍यानी अंढेरा पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली. त्यात, त्यांचे पती शरद प्रेमचंद सोनुने यांनी तक्रारदार महिलेचा घरच्या मंडळीच्या सांगण्यावरून शारीरिक व मानसिक छळ केला. हा छळ करीत असताना पती शरद सोनुने याने जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवून पीडित महिलेला मारहाण केली. घर बांधण्यासाठी कर्ज काढून पैशाची व्यवस्था कर या कारणाने पीडित महिलेचा छळ केला. आंतरजातीय विवाह केल्यामुळे सासरच्या मंडळीने पीडित महिलेच्या पतीला तू या मुलीसोबत लग्न का केले. तुला याहीपेक्षा चांगली मुलगी तसेच हुंडा देणारी मुलगी मिळाली असती या कारणाने छळ केल्याचे नमूद आहे.

हेही वाचा: विनापरवानगी मोर्चा काढणे भोवले; दोनशे जणांविरुद्ध गुन्हे

यावरून अंढेरा पोलिसांनी सासरच्या मंडळी तसेच पतीच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून यात शरद प्रेमचंद सोनुने (पती), प्रेमचंद सोनुने (सासरे), कमलाबाई प्रेमचंद सोनुने (सासू), महिला पोलिस कर्मचारी माया राजेंद्र चिंचोले (नणंद), पोलिस शिपाई सागर प्रेमचंद सोनुने (दीर) राहणार चिखली, राजेंद्र चिंचोले ( पोलिस शिपाई), जिल्हा कारागृह बुलडाणा येथील महिला कर्मचारी संगीता अमोल पठ्ठे (नणंद) व अमोल पठ्ठे (मोठे नंदोइ ) आयआरबी, झांसी, उत्तर प्रदेश अशा आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. यात विशेष बाब म्हणजे आरोपी मधील दोन महिला व दोन पुरुष हे पोलिस विभागात कार्यरत आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनात अंढेरा पोलिस अधिक तपास करीत आहे.

loading image
go to top