नशेखोरांचे 'चल यार गांजा मार', महिलाही करतात नशा; प्रवाशांमध्ये भीती

कारंजा बसस्थानकात असामाजिक तत्त्वांचा वावर
drug addict women also drugs
drug addict women also drugssakal

कारंजा (लाड) : गेल्या काही दिवसांपासून एस.टी. कर्मचारी संपावर आहे. त्यामुळे, काही बसफेऱ्या सुद्धा बंद आहे. या कारणास्तव, बस स्थानकात शुकशुकाट असतो. यामुळे बस स्थानकात आता असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. त्यामुळे, नशेखोर याठिकाणीच ठाण मांडून ''चल यार दम मार'' म्हणत आपली तल्लफ बिनधास्तपणे भागवित असल्याने याचा त्रास बसफेऱ्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. त्यामुळे, पोलिस प्रशासन व एस.टी. महामंडळ कारंजा आगार यांनी समन्वय साधून या नशेखोरांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.

एसटीच्या ३० टक्के प्रमाणात बसफेऱ्या पुन्हा सुरु झाल्या असल्याने कारंजा लाड बस स्थानकावर कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रेलचेल दिवसागणिक वाढत आहे. अकोला, वाशीम, अमरावती यासारख्या जिल्ह्यातून अपडाऊन करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. असे, असतानाच या बसस्थानकात असामाजिक तत्त्वांनी मध्यंतरीच्या काळात आपले जाळे घट्ट विणले आहे. बस स्थानकाच्या समोरील आणि मागील बाजूस दिवसा नि रात्रीच्या दरम्यान हुल्लडबाज तरुण मुले, महिला यांचा घोळका दृष्टीस पडत आहे.

ही मंडळी नशेचे साहित्य जमा करुन या ठिकाणीच ठिय्या मांडत नशा करतात. त्यानंतर, ते स्थानकातील प्रवाशांना पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यास शिवीगाळ देखील करतात. हा प्रकार बस स्थानकाचा कारभार ठप्प असण्याच्या कालावधीत चालून गेला. मात्र, आजरोजी बसफेऱ्या काही प्रमाणात सुरू झाल्याने याचा त्रास प्रवाशांना होऊन त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवाय, पाकीट मारणे, चैन स्नॅचिंग, बॅग पळविणे असे प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. पोलिस चौकी बस स्थानकात तैनात आहे. मात्र, तरीसुद्धा बिनधास्त वावरणाऱ्या या नशेखोरांवर कुठलीही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न प्रवाशीवर्गांना पडत आहे.

त्यामुळेच, अशा नशेखोरांचे मनसुबे आणखीनच वाढले असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराला वेळीच आळा बसवून होणाऱ्या मोठ्या घटनांपासून प्रवाशांचे संरक्षण करण्याकरिता कारंजा आगार आणि पोलिस प्रशासन यांनी समन्वयाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी वजा चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com