चांडोळ येथे अवकाळी पावसामुळे घरावर पडली वीज

Due to unseasonal rain in chandol electricity fell on the house
Due to unseasonal rain in chandol electricity fell on the house

चांडोळ (बुलडाणा) : वादळी वार्‍यासह अवकाळी पावसामुळे तसेच सोसाट्याच्या वादळी वार्‍यामुळे नागरिक धास्तावले होते. वातावरणात झालेल्या अचानकच्या बदलांमुळे बळीराजाला सुद्धा धक्काच बसला. काढणीयोग्य असलेल्या शेतातील माल पुन्हा तोंडातून हिरावला जातो की काय? याची काळजी बळीराजाला चिंतित करत आहे. दरम्यान गावातील एका घरावर वीज पडल्याची घटना घडली आहे.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या; अन्यथा स्वाभिमानी तीव्र आंदोलन छेडणार
 
मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वादळी वार्‍यात राजू भवटे यांच्या घरावरील गॅलरीत तसेच अंगणात वीज पडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. अंगाचा थरकाप उडवणारा क्षण पाहून तसेच त्यात दैव बलवत्तर म्हणून कोणतीच जीवित हानी झाली नसल्याचे समाधान त्या गल्लीतल्या नागरिकांनी सकाळ सोबत बोलताना सांगितले.

वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस सुरू असताना अचानकपणे भर वस्तीत वीज कोसळली. तेव्हा पत्रकार सुरेश सोनुने दुकानाचे शटर बंद करून पुढे सरकले अन् नेमकी त्याच ठिकाणी वीज कोसळली. त्यामुळे सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले असल्याची प्रतिक्रिया आपल्या सहकार्यांसोबत व्यक्त केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com