Akola News : डीवायएसपी शंकर शेळके यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ व ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात येत आहे.
DYSP Shankar Shelake

DYSP Shankar Shelake

sakal

Updated on: 

अकोला - दीर्घकालीन, निष्कलंक व गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ व ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन प्रमुख तथा नुकतेच पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती झालेले शंकर विठ्ठल शेळके यांची ‘अति-उत्कृष्ट सेवा पदका’साठी निवड झाली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त (ता. १५) पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते शेळके यांचा पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com