Akola News | विदर्भावादी उतरणार निवडणुकीच्या रिंगणात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

enter election twelve Balutedar Samaj

अकोला : विदर्भावादी उतरणार निवडणुकीच्या रिंगणात!

मूर्तिजापूर : विदर्भाचा आणि विदर्भातील संपत्ती बरोबरच जनतेचा केवळ उपयोग राज्यकर्त्यांनी करून घेतला असून प्रत्येक वेळी विदर्भाच्या पदरी निराशा पडली, आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आपला लढा तीव्र करतांना जय विदर्भ पार्टीच्या माध्यमातून राजकारणात उतरून विदर्भाच्या हक्कासाठी आपले उमेदवार नगर पालिकेसह लोकसभेच्याही निवडणुकीत उभे करणार असल्याचे निग्रही प्रतिपादन ज्येष्ठ विदर्भवादी नेते ॲड.वामनराव चटप यांनी येथे केले.

हेही वाचा: Most Expensive Train Rides: जगातील 5 सर्वात महागड्या ट्रेन राइड्स!

विदर्भ राज्य आंदोलन समिती व बाराबलुतेदार समाज संघटनेच्या वतीने येथील श्री दत्त मंदीर सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष टाले होते.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या उपाध्यक्षा रंजना मांमुर्डे, जिल्हाध्यक्ष सुरेश जोगले, विथी शाखा जिल्हाध्यक्ष ॲड.राहूल महल्ले, महिला शाखा जिल्हाध्यक्षा सविता वाघ, महाराष्ट्र नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष भावेश झाला प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा: नागपूर ग्रामीण भागात कोरोना बळींच्या संख्येत वाढ

बाराबलुतेदार समाजाची ताकत एकवटली, तर दुसर्‍या कोणाची हिंमत या समाजांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची होणार नाही, असे मत प्रास्ताविकातून महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघाचे प्रदेश मुख्य संघटक अरविंद तायडे यांनी व्यक्त केले . संजय चहाकर, शरद कलतकर, माजी सैनिक तांबडे, अशोक तिडके, संतोष श्रीवास, शिवदास तिरकर, प्रकाश नांदेकर, संभाजी वडूरकर, ग्रा.पं.सदस्य बाळा धबाले, गजानन सवईकर, संतोष शहाकर, विलास उमेकर, रूपेश चहाकर, सोनेकर, दीपक उमेकर, सुधाकर वानखडे, राजेंद्र कान्हेरकर, उमेश साखरे, गजानन चौधरी, पंकज वानखडे, मिलिंद जामनिक, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल डाहेलकर यांनी केले. नरेंद्र खवले यांनी आभार मानले.

Web Title: Enter Election Twelve Balutedar Samaj And Vidarbha State Andolan Samiti Meet In Excitement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..