अकोला : सूर्य ओकतोय आग, होऊ शकतो उष्मा‘घात’!

यावर्षी थोडा लवकरच कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. आतातर सूर्य आग ओकू लागला असून, पारा ४४ अंशापार गेला आहे.
Expert advice sun burning heat stroke mercury 44 degrees
Expert advice sun burning heat stroke mercury 44 degreessakal

अकोला : यावर्षी थोडा लवकरच कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. आतातर सूर्य आग ओकू लागला असून, पारा ४४ अंशापार गेला आहे. अशा परिस्थितीत कडक उन्हासोबत गरम हवा वाहू लागते. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते आणि उष्णाघात टाळण्यासाठी आवश्‍यक काळजी घेण्यासोबतच आवश्‍यक व प्रभावी घरघुती उपाय सुद्धा अवगत करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या तापमानाचा जोर वाढला असून, पारा ४४ अंशापार गेला आहे. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, उष्माघात टाळण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. उष्माघाताची कारणे आणि लक्षणे देखील जाणून घेणे गरजेचे असून, खालील प्रमाणे घरगुती उपाय केल्यास उष्माघात टाळता येऊ शकतो. मात्र, अधिक त्रास झाल्यास डॉक्टरांना दाखवावे, असा सल्ला अकोल्यातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. निखिल बक्षी यांनी दिला आहे.

उष्माघाताची कारणे

कडक उन्हात पूर्णपणे झाकून बाहेर न पडणे, कडक उन्हात अनवाणी चालणे, एसीची जागा सोडून लगेच उन्हात पोहोचणे, कमी पाणी पिणे, उन्हातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिणे इत्यादी गोष्टींमुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक राहाते.

उष्माघाताची लक्षणे

वारंवार तोंड कोरडे पडणे, धाप लागणे, उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी, उच्च ताप, हात आणि पाय सुन्न होणे, अशक्त वाटणे, जास्त थकवा जाणवणे इत्यादी उष्णाघाताची लक्षणे दिसून येऊ शकतात.

उष्माघातावरील उपाय

  • धणे व जिरे कोमट पाण्यात भिजवून ठेवा. ते फुगले की मॅश करून गाळून घ्या आणि थोडी साखर घालून प्या. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे कमी होते.

  • उन्हाळ्याच्या हंगामात कैरीचं पन्हं फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये केशर, विलायची, जायफळ टाकावे.

  • नाकातून रक्त येणे लक्षण असल्यास दुर्वा रस पिण्यास द्यावा, असे सारखे झाल्यास डॉक्टरांना दाखवणे. दही, तळलेले पदार्थ, तिखट, मसाला पदार्थ टाळणे.

  • तळपाय आग होणे लक्षण असल्यास शतधोत घृत किंवा पिंड तेल तळपाय मालिश करणे.

  • डोळे आग होत असल्यास गुलाबजल पट्या डोळ्यावर ठेवणे किंवा कोरफड गर/चंदन+मुलतानी माती फेस पॅक चेहऱ्यावर लावावा.

  • उन्हाळ्यात डाळींब/कोकम/नारळपाणी/वाळा सारखे थंड सरबत तहान भागवण्यासाठी उपयुक्त असतात.

  • कच्चा कांदाही उन्हापासून वाचवण्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे कांद्याचे सेवन अधिक प्रमाणात करावे. सुती कपडे, गॉगल वापरणे. शितली व सित्कारी प्राणायाम शरीरास थंडावा देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com