Akola News : चक्क तहसीलदाराची खोटी स्वाक्षरी; हजारो ब्रासच्या रॉयल्टीत अफरातफर, पोहरादेवी येथील घटना

श्री क्षेत्र पोहरादेवी, उमरीगड येथील मंदिर बांधकामाच्या गौण खनिज (मुरूम) रॉयल्टीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रावर चक्क तहसीलदारांची खोटी स्वाक्षरी करण्याचा प्रकार पोहरादेवी येथील कंत्राटदाराच्या व्यक्तीने केला आहे.
fake signature of tehsildar incidents Poharadevi fraud in royalty of thousands of sand brass
fake signature of tehsildar incidents Poharadevi fraud in royalty of thousands of sand brassSakal

मानोरा : श्री क्षेत्र पोहरादेवी, उमरीगड येथील मंदिर बांधकामाच्या गौण खनिज (मुरूम) रॉयल्टीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रावर चक्क तहसीलदारांची खोटी स्वाक्षरी करण्याचा प्रकार पोहरादेवी येथील कंत्राटदाराच्या व्यक्तीने केला आहे. या प्रकारातून संबंधिताने वडगाव शिवारातून हजारो ब्रासची गौण खनिज (मुरूम) ची रॉयल्टी काढल्याची माहिती आहे.

पोहरादेवी आणि उमरी येथे शासनाच्या वतीने विकासकामे केली जात आहेत. येथील सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने पोहरादेवी येथील भिका रामदास राठोड या व्यक्तीने गेल्या काही दिवसांत सुमारे एक हजार ब्रास मुरुमाची रॉयल्टी तहसीलदारांची खोटी स्वाक्षरी करून काढली. हा प्रकार धक्कादायक असून, यापूर्वीही अशा प्रकारे खोटी स्वाक्षरी करून कोणी, किती गौण खनिजाची रॉयल्टी काढली असेल? हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.

गौण खनिज प्रमाणपत्रानुसार ३१ जानेवारी २०२३ रोजी ३०० ब्रास, १९ ऑक्टोबर रोजी २०० ब्रास, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ४०० ब्रास एवढ्या प्रमाणात खोटी स्वाक्षरी करून रॉयल्टी काढण्यात आली आहे. या प्रकरणी तहसीलदार कोणती भूमिका घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागले. या गंभीर प्रकरणात अजूनही कोणावर कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पोहरादेवी, उमरीगड येथील बांधकामाच्या गौण खनिज (मुरूम) रॉयल्टीसोबत जे प्रमाणपत्र दिले जाते, त्यावरील स्वाक्षरी आपली नाही. हे प्रमाणपत्र ज्या वेळचे आहे, त्यावेळी आपण येथे रुजू झालो नव्हतो, तसेच तिन्ही प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी सारखीच आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तहसीलदारांची खोटी स्वाक्षरी करून गौणखनिज रॉयल्टी काढणे ही गंभीर बाब असून, दोषींवर कारवाई केली जाईल.

- डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार, मानोरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com