शेतात पडलेल्या विद्युत तारांनी घेतला शेतकऱ्याचा बळी!

तळेगाव (खु.) शेतशिवारातील घटना
Farmer was killed due to electric shock
Farmer was killed due to electric shocksakal

हिवरखेड - तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी गणेश सदाशिव भामोद्रे (वय ४८) शेती करून गावात भाजी विक्रीचा जोडधंदा करून कुटुंबाचा उदर्निवाह करतात. तळेगाव (खु.) येथील शेतशिवारात काही भाजी आणण्यासाठी गेलेले भामोद्रे यांना शेतात पडलेल्या विद्युत तारेचा जबर धक्का लागल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.

गणेश भामोद्रे शेतीसह कुटुंबाचा उदर्निवाह करण्यासाठी गावातच जोडधंदा म्हणून घरोघरी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. अशातच तीन-चार दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे व पैशाची चणचण भासत असल्यामुळे काही तरी कमाऊन आणून कुटुंबातील मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रानभाज्या आणून त्या विकून काही पैसे मिळतील या उद्देशाने ते गुरुवारी सकाळीच गावालगत असलेल्या तळेगाव खुर्द येथील शेतशिवारामध्ये गेले असता, भाजी गोळा करण्यापूर्वीच त्या तरुण शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. शेतात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारावर गणेशचा पाय पडल्यामुळे त्याचा घटनास्थळीच तडफळून मृत्यू झाला आणि भामोद्रे कुटुंबांवर दुःखाचे डोंगर कोसळले.

नेहमी एकटा जाणाऱ्या गणेशच्या पाठेमागे गावातीलच एक तरुण भाजी आणण्याच्या हेतूने चालत होता. परंतु, जसा गणेशचा पाय जिवंत विद्युत तारेवर पडला आणि तो खाली पडल्याचे पाहून त्याचा सोबती सतर्क झाला. त्याने आरडाओरडा केल्यामुळे आजुबाजूचे शेतकरी, मजूर व सरपंच धांडे अपघातस्थळी जमा झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता तेल्हारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला.

या घटनेला पूर्णपणे महावितरण कंपनीच जबाबदार असल्यामुळे मृतकाच्या कुटुंबियाला आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. याप्रकरणी हरिदास मुकिंदा इंगळे (वय ५० रा. तळेगाव बाजार) यांच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com