esakal | शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काढले कर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

crop loan.

या संपूर्ण प्रकरणावरून सेवा सहकारी संस्था दानापूर मनमानी करून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवून आर्थिकदृष्ट्या नुकसान करीत आहे.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काढले कर्ज

sakal_logo
By
सुनिलकुमार धुरडे

दानापूर ( अकोला) : सेवा सहकारी सोसायटीने विश्वासात न घेता परस्पर पिक कर्जाचे पुर्नगठन करून ३०-३५ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्तीपासून वंचित राहावे लागले आहे. यात आमची फसवणूक झाली आहे. पिक कर्जाची पंरस्पर पुर्नगठन सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा, या आशयाची लेखी तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. 

सविस्तर वृत्त असे आहे की, सन २०१६ ते २०१९ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जाचे विश्वासात न घेता सेवा सहकारी संस्थेने परस्पर पुर्नगठन करण्यात आल्याची तक्रार दानापूर येथील शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक तेल्हारा १६  मार्च २०२० केली होती. या पुर्नगठनामुळे तुटपुंज्या स्वरुपात कर्ज माफी झाली आहे.

याबाबत सचिवांना विचारले असता ऊडवाऊडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. काही लोकांचे संमतीपत्र  दाखवली, परंतू त्यावरील सहया बनावट असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. एकाच वेळेस सभासदांनी कर्ज काढले होते. काही सभासदांना संपूर्ण कर्ज माफ झाले. काहीचे पुर्नगठनमुळे महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. 

या संपूर्ण प्रकरणावरून सेवा सहकारी संस्था दानापूर मनमानी करून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवून आर्थिकदृष्ट्या नुकसान करीत आहे. दरवर्षीची नापिकी, गारपीट या सर्व बाबीमुळे हालाखीची परिस्थिती आणि सोसायटीने केलेल्या अन्यायामुळे आम्हा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी.

अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे

कमला शालीग्राम हागे, प्रमिला वासुदेव पिंजरकर, गोकूळा मनोहर फोकमारे, वसंता चवंडकार, भगवान ढगे, रमेश गळसकार, प्रकाश कूले, शालीग्राम हागे, गंगाधर झगडे, भिकाजी हागे, देवेंद्र सिंह सिसोदिया, सै.अयूब सै.याकूब व इतर शेतकरी. 

संपादन - सुस्मिता वडतिले