agriculture minister dattatray bharane
sakal
अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी झालेल्या शिवार फेरीत शेतकऱ्यांचा प्रचंड रोष उसळला. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी ‘साहेब, आमच्या शेतात पोहोचायलाच रस्ता नाही; तो करा!’ असे म्हणत पाणंद रस्त्याच्या मुद्यावरून दोन्ही मंत्र्यांना धारेवर धरले.