esakal | सोयाबीनला चार हजाराचा भाव; शेतकऱ्यांमध्ये समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

crop

भारतासह अमेरिका, ब्राझील आदी देशांमध्ये सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तेथील भावावर आपल्याकडे दर निश्चित होतात. यावर्षी सोयाबीनमध्ये तेजी येणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सोयाबीनला चार हजाराचा भाव; शेतकऱ्यांमध्ये समाधान

sakal_logo
By
कृष्णा फंदाट

तेल्हारा (अकोला) : तालुक्यात सोयाबीनचा उतारा कमी आला पण खुल्या बाजारात भाव चार हजारावर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. हमीभाव केंद्रावर शुकशुकाट आहे. तालुक्यात कपाशी खालोखाल सोयाबीनचा पेरा आहे. खरिपातील साडेतीन महिन्याचे हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. गतवर्षीपर्यंत कधी जास्त पाऊस तर कधी कमी पाऊस शिवाय कमी भाव यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. 

हे ही वाचा : रास्तभाव दुकानाकरीता प्रस्ताव आमंत्रित 

या हंगामात बदलते हवामान, जास्त प्रमाणात पाऊस यामुळे सोयाबीनची उत्पादकता एकतरी तीन ते सहा क्विंटलपर्यंतच आहे. त्यातही खर्च खूप करावा लागला, पण यावर्षी खुल्या बाजारात चांगला सोयाबीन चार हजार रू भाव मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान शासनाने हमी भाव केंद्र सुरू करून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली. मात्र खुल्या बाजारात भाव मिळत असल्याने नोंदणी केंद्राकडे पाठ फिरवली. शासनाने 3,880 रू. दर जाहीर केले, पण अटी खूप आहेत. 

हे ही वाचा : महाबीजचे प्रमाणित बियाणे अनुदानीत दरात उपलब्ध

भारतासह अमेरिका, ब्राझील आदी देशांमध्ये सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तेथील भावावर आपल्याकडे दर निश्चित होतात. यावर्षी सोयाबीनमध्ये तेजी येणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

तेल्हाराचे शेतकरी प्रमोद गावंडे म्हणले, यावर्षी सोयाबीन पीक चांगले आले नाही खरं तर खर्च देखील निघत नव्हता, अशी स्थिती होती. पण भाव बरे असल्यास हाताला हात पुरतात.  

संपादन - सुस्मिता वडतिले