महाबीजचे प्रमाणित बियाणे अनुदानीत दरात उपलब्ध

अनुप ताले
Friday, 16 October 2020

महाबीज मार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांव्दारे प्रत्येक तालुक्यात 15 ऑक्टोंबरपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येत आहे.

अकोला : शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानीत दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य पिकांच्या नवीन वाणाचा (10 वर्षाच्या आतील व 10 वर्षावरील) प्रचार प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत हरभरा पिकाच्या 10 वर्षाआतील वाणास रु. 25/- प्रति किलो व 10 वर्षावरील वाणास रु. 12/- प्रति किलोप्रमाणे अनुदानीत दराने बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

हे ही वाचा : पुन्हा पाऊस येणार सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

महाबीज मार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांव्दारे प्रत्येक तालुक्यात 15 ऑक्टोंबरपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येत आहे. सदर अनुदानीत दराने उपलब्ध प्रमाणित बियानेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी बियाणे पुरवठादार संस्थांच्या अधिकृत वितरकांकडे 10 वर्षा आतील वाणास रु. 25/- प्रति किलो व 10 वर्षावरील संस्थांच्या अधिकृत वितरकांकडे 10 वर्षा आतील वाणास 25 रुपये प्रति किलो व 10 वर्षावरील वाणास रु.12/- प्रति किलोप्रमाणे अनुदान वजा जाता दराने प्रमाणित बियाणे खरेदी करायचे आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व दुरुक्ती टाळण्याकरीता महाबीज अकोला यांनी विकसित केलेल्या (Mahabeej Marketing Delears Aap) च्या आधारे वितरण करण्यात येणार असल्यामुळे महाबीजचे बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांना परमिटची आवश्यकता नाही. परंतु मुळ आधारकार्ड, आठ-अ, सातबारा आणि मागसवर्गीय शेतकरी असल्यास जातीच्या दाखल्याची स्वंयस्वाक्षांकित प्रत महाबीज विक्रेत्याकडे घेवून जाने आवश्यक आहे.  

हे ही वाचा :  चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन,  विधवा महिला अलिशान बी. ने घेतले  विक्रमी उत्पादन

या योजनेत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प व अल्प भूधारक (अपंग, महिला, माजी सैनिक आत्महत्याग्रस्त कुटुंब) शेतकऱ्यांनाच 0.40 हे मर्यादेपर्यंत 30 किलो बियाणे प्रति लाभार्थी मिळू शकेल व प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर वाटप करण्यात येईल. प्रमाणित बियाणे वितरण घटका अंतर्गत 10 वर्षा आतील बियाणे वितरण महाबीज वितरकामार्फत हरभरा पिकाच्या राजविजय-202 व फुले विक्रम हे वाण उपलब्ध प्रमाणे वितरीत करण्यात येत आहे.

तसेच 10 वर्षावरील बियाणे वितरणाचे हरभरा पिकाच्या दिग्विजय, जाकी-9218, विजय हे वाण उपलब्ध प्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाच्या अनुदानीत दराने प्रमाणित बियाण्याचा लाभ घेण्याकरीता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिकृत बियाणे वितरकाकडून अनुदानीत दराने प्रमाणित बियाणे खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 

अधिक माहितीकरिता कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी तसेच महाबीज यांच्या अधिकृत वितरकांशी संपर्क साधावा. महाबीज अकोला यांच्याकडून  हरभरा बियाणे अनुदानीत दरावर महाबीजचे अधिकृत वितरकांकडे उपलब्ध होईल.

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seeds are being made available at subsidized rates through Mahabeej