esakal | शेतकरी संघटना ठोकणार पोलिस स्टेशनला कुलूप
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी संघटना ठोकणार पोलिस स्टेशनला कुलूप

शेतकरी संघटना ठोकणार पोलिस स्टेशनला कुलूप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः तक्रारीची पोच मागितली म्हणून शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाप्रमुखांना मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा, अन्यथा शेतकरी संघटना दैठणा पोलिस स्टेशनला कुलूप ठोकणार असल्याचे माहिती निवेदनातून उपविभागीय अधिकारी अकोट आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना शेतकरी संघटना अकोट व तेल्हारा यांच्या वतीने देण्यात आली. (Farmers' union to hit police station)

हेही वाचा: अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दी


या आंदोलनामध्ये तालुका अकोट व तेल्हारामधून शेतकरी सहभागी होणार आहेत. निवेदनात परभणी येथील दैठणा पोलिस ठाण्यातील कर्मचारी बळीराम मुंडे याने शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव शिंदे यांना विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केली आहे. पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीची पोहोच देण्याची विनंती केली असता अनेक लोकांसमोर मारहाण केली आहे. २३ जून २०२१ रोजी घडलेल्या प्रकाराची तक्रार लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून, मग्रूर पोलिसावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. परंतु, आजतागायत पोलिस बळीराम मुंडे (बक्कल क्र.८२५) यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्याने केलेल्या गुन्हाबद्दल मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा: Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी

४ जुलैपर्यंत पोलिस बळीराम मुंडे यांच्यावर कारवाई न झाल्यास, शेतकरी संघटनेच्या वतीने दैठणा (ता.जि. परभणी) येथील पोलिस स्टेशनला कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोट व तेल्हारा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दैठणा येथे ५ जुलै २०२१ रोजी जाणार असल्याचे निवेदनातून कळविले आहे. निवेदन देताना शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख (माहिती व तंत्रज्ञान आघाडी) लक्ष्मीकांत कौठकर, माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, दिनेश देऊळकार, गोपाल निमकर्डे, अजित कळसकर, दिनेश गिर्हे, मोहन खिरोडकर आदी उपस्थित होते.


Farmers' union to hit police station

loading image